Shreyas Iyer: चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणाऱ्या अय्यरला BCCI देणार मोठं गिफ्ट; काय आहे प्लान?

Shreyas Iyer Will Recieve BCCI Central Contract: भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने दमदार खेळ करुन दाखवला आहे. या कामगिरीच्या बळावर बीसीसीआय त्याला मोठं गिफ्ट देणार आहे.
Shreyas Iyer: चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणाऱ्या अय्यरला BCCI देणार मोठं गिफ्ट; काय आहे प्लान?
shreyas iyertwitter
Published On

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये पोहोचवलं आहे. या स्पर्धेत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने दमदार खेळ करुन दाखवला आहे. भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला आहे, तेव्हा तेव्हा श्रेयस अय्यरने संघाला संकटातून बाहेर काढलं आहे.

गेल्या वर्षी श्रेयस अय्यरला श्रेयस अय्यरला सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टकडून काढण्यात आलं होतं. आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी पाहून बीसीसीआय श्रेयस अय्यरला मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे.

Shreyas Iyer: चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणाऱ्या अय्यरला BCCI देणार मोठं गिफ्ट; काय आहे प्लान?
IND vs AUS : इथेच सामना फिरला, अन्यथा भारताच्या हातून फायनल निसटली असती,VIDEO

भारतीय संघातून बाहेर असताना, देशांतर्गत क्रिकेट खेळण्याला नकार दिल्याने श्रेयसवर बीसीसीआयने कारवाई केली होती. त्याला सेन्ट्रल कॉन्ट्र्रॅक्टमधून बाहेर करण्यात आलं होतं. मात्र टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो.

मात्र त्याला कुठल्या कॅटेगरीचा कॉन्ट्रॅक्ट मिळणार, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. यासह आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. केएल राहुल, रिषभ पंत आणि अक्षर पटेलला यांचं देखील प्रमोशन होऊ शकतं. अक्षर पटेल आणि रिषभ पंत हे दोघे बी कॅटेगरीत आहेत. तर केएल राहुल ए कॅटेगरीत आहेत.

Shreyas Iyer: चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणाऱ्या अय्यरला BCCI देणार मोठं गिफ्ट; काय आहे प्लान?
Ind Vs Aus Match Highlights : विराटची संयमी खेळी ते हार्दिकची हार्ड हिटिंग, ही आहेत भारताच्या विजयाची प्रमुख कारणे

बीसीसीआयच्या ए प्लस कॅटेगरीत ४ खेळाडूंचा समावेश

बीसीसीआयने ए प्लस, ए, बी आणि सी कॅटेगरी ठरवली आहे. बीसीसीआयने ठरवलेल्या ए प्लस कॅटगरीत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या ४ खेळाडूंचा समावेश आहे.

तर बीसीसीआयच्या ए कॅटेगरीत मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शुभमन गिल, केएल राहुल आणि आर अश्विन यांचा समावेश आहे. या यादीत असलेले ४ खेळाडू अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत. तर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Shreyas Iyer: चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवणाऱ्या अय्यरला BCCI देणार मोठं गिफ्ट; काय आहे प्लान?
Champions Trophy: भारताने फायनल गाठली, पण सुनील गावसकर नाराज; या कारणामुळे रोहित -गिलला झापलं

अय्यरची दमदार कामगिरी

श्रेयस अय्यरने गेल्या काही महिन्यांपासून दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. यादरम्यान त्याने ४ अर्धशतकं झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने ४५ धावांची खेळी केली होती. तर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने ७९ धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ५६ धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com