Sanju Samson : संजू सॅमसन भारताचा कर्णधार, BCCI ने घेतला मोठा निर्णय

बीसीसीआयने संजू सॅमसनला मोठी जबाबदारी दिली आहे.
Sanju Samson
Sanju SamsonSaam TV
Published On

नवी दिल्ली : विकेटकिपर आणि आक्रमक फलंदाज संजू सॅमसनची (Sanju Samson) टी-२० विश्वचषक २०२२ साठी भारतीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली नाही. पण बीसीसीआयने आता संजूला मोठी जबाबदारी दिली आहे. न्यूजीलंड ए च्या विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंडिया-ए टीमचा (Indian A Team) कर्णधार म्हणून संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे. संजूच्या व्यतिरिक्त १६ खेळाडूंच्या टीममध्ये उमरान मलिकचा समावेश करण्यात आला आहे. (Indian Cricketer sanju samson latest news update)

Sanju Samson
Team India : टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाला दुखापत, मोठ्या स्पर्धेतून झाला बाहेर

संजू सॅमसनचा आगामी टी-२० विश्वचषक २०२२ साठी टीम इंडियात समावेश करण्यात आला नाही. बीसीसीआयच्या या निर्णयामुळं क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला होता. पंरतु, आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेत संजू सॅमसनला न्यूजीलंड ए च्या विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाच ए चं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली आहे.

बीसीसीआईकडून निवडलेल्या १६ खेळाडूंच्या टीममध्ये सर्वाधिक खेळाडू असे आहेत, ज्यांची विश्वचषकाच्या स्क्वॉडमध्ये निवड होऊ शकली असती. परंतु, या खेळाडूंना ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२२ साठी संधी मिळाली नाही. यामध्ये संजू सॅमसन, पृथ्वी शॉ, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. आता हे खेळाडू न्यूझीलंड ए टीमच्या विरोधात चमकदार कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.

भारत-ए-टीम : पृथ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (विकेटकीपर),कुलदीप यादव,शाहबाज अहमद,राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकुर , उमरान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com