Asia Cup Under 19 Womens: आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, पहिल्याच सामन्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने

Asia Cup Under 19: टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याच थरार अनुभवता येणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने अंडर 19 वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली.
Asia Cup Under 19 Womens team
Asia Cup Under 19bcci
Published On

बीसीसीआयने गुरुवारी 12 डिसेंबर रोजी अंडर 19 वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीने मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केलाय. तसेच राखीव खेळाडूंनाही स्थान देण्यात आलं आहे. पहिल्याच सामन्यात इंडियाविरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत अजून काही स्पष्टता झाली नसली तरी भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर लवकरच आमनेसामने येणार आहेत. एसीसी ज्युनियर महिला अंडर-19 आशिया कपमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पहिल्याच सामन्यात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आशिया कपसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली असून भारतीय संघाची कमान अष्टपैलू निक्की प्रसादकडे सोपवण्यात आलीय.

सानिका चाळके हिच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आलीय. तर गुजरात जायंट्सची वेगवान गोलंदाज एमडी शबनमचाही या संघात समावेश करण्यात आलाय. ACC ज्युनियर महिला अंडर-19 एशिया कप 15 ते 22 डिसेंबर दरम्यान क्वालालंपूर येथे होणार आहे. या स्पर्धेचे सर्व सामने ब्युमास क्रिकेट ओव्हल येथे खेळवले जातील.

Asia Cup Under 19 Womens team
Ind vs Aus 3rd Test : रोहित शर्मा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमकं घडलं तरी काय?

भारताला पाकिस्तान आणि नेपाळसह अ गटात तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि यजमान मलेशियाचा समावेश करण्यात आलाय. भारत 15 डिसेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध या स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. यानंतर 17 डिसेंबरला टीम इंडियाचा सामना नेपाळशी होणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील. सुपर फोरमधील अव्वल दोन संघ 22 डिसेंबर रोजी अंतिम फेरीसाठी आमनेसामने येतील.

Asia Cup Under 19 Womens team
AUSW vs INDW: किती स्तृती करावी स्मृतीची! पर्थच्या मैदानात मंधानानं झळकावलं वनडे करिअरचं ९वं शतक

भारतीय अंडर-19 संघ पुढीलप्रमाणे: निक्की प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके, जी त्रिशा, कमलिनी जी, भाविका अहिरे, ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी द्रीथी, आयुषी शुक्ला, आनंदिता के. , एमडी शबनम, नंदना एस. स्टँडबाय: हर्ले गाला, हॅपी कुमारी, जी काव्या श्री, गायत्री सुरवसे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com