टी-२० क्रिकेटमधील नवा 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम माहितेय का? BCCI ने दिली 'ही' महत्वाची माहिती

बीसीसीआयने टी-२० किक्रेट (Cricket) सामने आणखी रंजक बनवण्यासाठी 'इम्पॅक्ट प्लेयर' नवा नियम आणण्याची तयारीत केली आहे.
Impact Player rule BCCi
Impact Player rule BCCi saam tv
Published On

Impact Player rule BCCI : बीसीसीआयने टी-२० किक्रेट (Cricket) सामने आणखी रंजक बनवण्यासाठी 'इम्पॅक्ट प्लेयर' नवा नियम आणण्याची तयारीत केली आहे. या नव्या नियमानुसार सामन्यादरम्यान आता ११ ऐवजी १५ खेळाडूंना खेळण्याची परवानगी मिळणार आहे. या नियमामुळे चालू सामन्यादरम्यान 'प्लेइंग ११'मधून एक खेळाडू बदलला जाऊ शकतो.

Impact Player rule BCCi
रिषभ पंत की दिनेश कार्तिक? टी-२० विश्वचषकात कुणाला दिली पाहिजे संधी, गावस्कर म्हणाले....

बीसीसीआय क्रिकेटमध्ये रंजकपणा वाढविण्यासाठी नियमात बदल करत असते. नुकतंच बीसीसीआयने एक नवीन नियम आणण्याची तयारीत आहे. या नियमानुसार चालू सामन्यात ११ ऐवजी १५ खेळाडूंना खेळण्यास पात्र असतील. सध्या बीसीसीआय 'इम्पॅक्ट प्लेयर' हा नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे.

बीसीसीआयचा हा नवा नियम प्रथम देशांतर्गत क्रिकेटमध्ये लागू करण्यात येणार आहे. असा नियम फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल आणि बेसबॉलसारख्या खेळांमध्ये वापरण्यात येतो. बीसीसीआयने सदर नियम सर्वप्रथम सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सदर आयपीएलमध्ये देखील लागू करण्याची शक्यता आहे.

Impact Player rule BCCi
India vs Australia : पहिल्या टी-२० सामन्यात 'अशी' असणार टीम इंडियाची प्लेईंग-११?

असा आहे 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम

नाणेफेकी दरम्यान कर्णधाराला ११ खेळाडूंसह आणखी ४ खेळाडूंची नावे सांगावी लागतील. या नियमाचा वापर करण्यासाठी कर्णधाराला चार खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला खेळण्याची संधी देऊ शकतो. अर्थात प्रथम फलंदाजी करताना संघाने लवकर विकेट गमावल्यास कर्णधार सदर नियमाचा वापर करून चांगला फलंदाज मैदानात उतरवू शकतो. त्याचप्रमाणे संघाने फलंदाजी चांगली केल्यास तर कर्णधार दुसऱ्या डावात एखादा गोलंदाज संघात घेऊ शकतो.

'इम्पॅक्ट प्लेयर'चा नियम वापरून ज्या खेळाडूच्या बदल्यात संघात स्थान दिले जाईल. त्या खेळाडूला पुन्हा मैदानात येता येणार नाही. तसेच 'इम्पॅक्ट प्लेयर'चा वापर करण्यासाठी कर्णधाराला क्षेत्रातील पंचाला आणि चौथ्या पंचाला सांगावे लागेल. तर बीसीसीआयच्या नियमांनुसार, आता सामन्यादरम्यान १४ व्या षटकाच्या आधीच या नियमाचा वापर करता येऊ शकतो. त्यानंतर सदर नियमाचा वापर करता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com