bcci announced central contract list know the grade wise salary of cricketers will get in this contract
bcci announced central contract list know the grade wise salary of cricketers will get in this contract yandex

BCCI Central Contract: BCCI कडून सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर! कोणाला किती सॅलरी मिळणार?

BCCI Central Contract List: बीसीसीआयने बुधवारी (२८ फेब्रुवारी) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून इशान किशन आणि श्रेयस अय्यरला बाहेर करण्यात आलं आहे
Published on

Annual Salary Of BCCI Central Contract List Players:

बीसीसीआयने बुधवारी (२८ फेब्रुवारी) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून इशान किशन आणि श्रेयस अय्यरला बाहेर करण्यात आलं आहे. या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये इशान किशन आणि श्रेयस अय्यरला वगळता एकूण ४० खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे..

माध्यमातील वृत्तानुसार, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी सांगण्यात आलं होतं. हे दोघेही रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी गेलेच नाही. त्यामुळे बीसीसीआयने ही कारवाई केली असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी श्रेयस अय्यर ग्रेड बीमध्ये तर इशान किशन ग्रेड सीमध्ये होता.

या खेळाडूंना डच्चू..

बीसीसीआयने जाहीर केलेल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीतून वरिष्ठ खेळाडूंना वगळण्यात आलं असून युवा खेळाडूंना प्राधान्य दिलं आहे. या यादीतून अजिंक्य रहाणे, शिखर धवन, युजवेंद्र चहल आणि उमेश यादवसारख्या स्टार खेळाडूंना बाहेर केलं आहे.

ए प्लसमध्ये या खेळाडूंचा समावेश..

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा (Cricket news marathi)

bcci announced central contract list know the grade wise salary of cricketers will get in this contract
IND vs ENG: धरमशाला कसोटीत जॉनी बेअरस्टोला इतिहास रचण्याची संधी! दिग्गज खेळाडूंच्या यादीत करणार प्रवेश

ग्रेड ए

मोहम्मद सिराज, आर अश्विन, मोहम्मद शमी, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या

ग्रेड बी

रिषभ पंत, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल हे खेळाडू ग्रेड बीमध्ये आहेत.

ग्रेड सीमध्ये या खेळाडूंचा समावेश..

रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवि बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

bcci announced central contract list know the grade wise salary of cricketers will get in this contract
BCCI Central Contract: इशान किशन - श्रेयस अय्यर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर! आता पुन्हा टीम इंडियाकडून खेळू शकणार का?

कोणाला किती सॅलरी मिळणार?

ग्रेड ए प्लसमध्ये असलेल्या खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रुपये दिले जातात. ग्रेड एमध्ये असलेल्या खेळाडूंना वर्षाला ५ कोटी रुपये दिले जातात. तर ग्रेड बीमध्ये असलेल्या खेळाडूंना वर्षाला ३ कोटी आणि सीमध्ये असलेल्या खेळाडूंना १ कोटी रुपये दिले जातात. यासह प्रत्येक सामन्याची मॅच फी देखील दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com