आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्या दिवशी पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात एक आगळी वेगळी घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यात आधी अंपायरने फलंदाजाला बाद घोषित केलं. त्यानंतर लगेचच डेड बॉल देण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी करत असलेल्या श्रीलंकेने शानदार गोलंदाजी केली आणि पाकिस्तानचा डाव ११६ धावांवर संपुष्टात आणला. या धावांचा पाठलाग करत असताना श्रीलंकेने १२ षटकअखेर ४ गडी बाद ५१ धावांपर्यंत मजल मारली. त्यावेळी पाकिस्तानकडून १३ वे षटक टाकण्यासाठी नाशरा संधू गोलंदाजीला आली. त्यावेळी डी सिल्वा फलंदाजी करत होती.
नाशरा गोलंदाजी करत असताना तिचा रुमाल खाली पडला. या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या निलाक्षीने स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा फटका फसला आणि चेंडू पॅडला जाऊन लागला. अंपायरने तिला बाद घोषित केलं. त्यावेळी फलंदाजाने अंपायरकडे रुमाल पडण्याची तक्रार केली. अंपायरने तिसऱ्या अंपायरकडे निर्णय पाठवला आणि हा चेंडू डेड घोषित करण्यात आला. या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काही फॅन्सचं म्हणणं आहे की, तिने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिला बाद घोषित करायला हवं होतं.
MCC चा अनुच्छेद २०.४.२.६ नुसार, जर स्ट्राईकवर असलेला फलंदाज फलंदाजीसाठी तयार असताना, कुठल्याही आवाजामुळे किंवा हालचालीमुळे लक्ष भटकणार असेल तर तो चेंडू डेड चेंडू घोषित केला जातो. श्रीलंकेची फलंदाज फलंदाजीसाठी तयार असताना पाकिस्तानच्या गोलंदाजाचा रुमाल पडला होता. त्यामुळे हा डेड चेंडू घोषित करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.