Taskin Ahmed: भारताविरुद्धच्या सामन्याआधी उपकर्णधाराने केली मोठी चूक! आता स्वत: केला मोठा खुलासा
bangladeshtwitter

Taskin Ahmed: भारताविरुद्धच्या सामन्याआधी उपकर्णधाराने केली मोठी चूक! आता स्वत: केला मोठा खुलासा

Taskin Ahmed News In Marathi: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामना पार पडला होता.
Published on

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यात भारत आणि बांगलादेशचा सामना झाला होता. या सामन्यात बांगलादेश संघातील वेगवान गोलंदाज आणि संघाचा उपकर्णधार तस्कीन अहमद खेळू शकला नव्हता. तो या सामन्यात उपस्थित नसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात तो झोपला होता. त्यामुळे त्याला भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला खेळाडू आणि टीम मॅनेजमेंटची माफी मागावी लागली होती. (Taskin Ahmed)

भारतीय संघाविरुद्ध झालेला सामना हा बांगलादेशच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. या सामन्यासाठी कर्णधाराने प्लेइंग ११ मध्ये ६ गोलंदाजांना स्थान दिलं होतं. वेगवान गोलंदाज म्हणून हसन साकिब आणि मुस्तफिजूर रहमान या गोलंदाजांना संघात स्थान दिलं गेलं होतं. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. या सामन्यात बांगलादेशला ५० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ६ गडी बाद १९६ धावा केल्या होत्या.

Taskin Ahmed: भारताविरुद्धच्या सामन्याआधी उपकर्णधाराने केली मोठी चूक! आता स्वत: केला मोठा खुलासा
IND-W vs SA-W: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! दक्षिण आफ्रिकेला 10 विकेट्सने लोळवलं

क्रिकबझच्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या एका अधिकाऱ्याने खुलासा केला आहे की, भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यावेळी तस्कीन अहमद हॉटेलमध्ये झोपा काढत होता. त्याला फोन करुनही त्याने फोन उचलले नव्हते. मात्र त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान का दिलं गेलं नाही, याबाबत कुठलाही खुसाला करण्यात आलेला नाही.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ' तस्कीनची टीम बस हुकली होती. त्यानंतर तो संघासोबत जोडला गेला होता. तस्कीनला भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात संधी मिळणार होती की नाही, याचं उत्तर हेड कोच देऊ शकतात. '

Taskin Ahmed: भारताविरुद्धच्या सामन्याआधी उपकर्णधाराने केली मोठी चूक! आता स्वत: केला मोठा खुलासा
IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com