T20 World Cup 2024: T-20 WC साठी बांगलादेशचा संघ जाहीर! शाकिब अल हसन नव्हे तर या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

Bangladesh Squad For T20 World Cup 2024: नुकताच बागंलादेश क्रिकेट बोर्डने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे.
T20 World Cup 2024: T-20 WC साठी बांगलादेशचा संघ जाहीर! शाकिब अल हसन नव्हे तर या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी
Bangladesh squad announced for t20 world cup 2024 know full squad here amd2000twitter

आगमी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या स्पर्धेसाठी जवळपास सर्वच संघांनी आपल्या स्क्वॉडची घोषणा केली आहे. नुकताच बागंलादेश क्रिकेट बोर्डने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. या संघाचं कर्णधारपद शाकिब अल हसनकडे नव्हे तर नजमुल हुसैन शांतोकडे सोपवण्यात आलं आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचा संघ झिम्बाब्वेविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. या मालिकेतील सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये बांगलादेशने विजय मिळवला होता. तर शेवटच्या सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेतही नेतृत्वाची जबाबदारी नजमुल हुसैन शांतोकडे देण्यात आली होती.

T20 World Cup 2024: T-20 WC साठी बांगलादेशचा संघ जाहीर! शाकिब अल हसन नव्हे तर या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी
IPL 2024 Playoffs Scenario: मुंबई,पंजाबसह गुजरात स्पर्धेतून बाहेर! ३ स्थानांसाठी ६ संघांमध्ये चुरशीची लढत

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत बांगलादेशचा पहिला सामना ८ जून रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. त्यानंतर १० जून रोजी दक्षिण आफ्रिका, १३ जून रोजी नेदरलँड आणि १७ जून रोजी नेपाळविरुद्ध होणार आहे.

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे बांगलादेशचा संघ:

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार ), तस्कीन अहमद, लिटन दास, सौम्य सरकार, तंजीद हसन तमीम, शाकिब अल हसन, तोहीद हृदयोय, महमूदुल्लाह रियाद, जेकर अली अनिक, तनवीर इस्लाम, शक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब.

राखीव खेळाडू -  अफीफ हुसेन, हसन महमूद. 

T20 World Cup 2024: T-20 WC साठी बांगलादेशचा संघ जाहीर! शाकिब अल हसन नव्हे तर या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी
RCB, IPL 2024: CSK विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का! संघातील २ प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com