आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या स्टार खेळाडूवर आयसीसीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
बांगलादेशसाठी १०० हून अधिक सामने खेळणाऱ्या नासिर हुसेनवर सप्टेंबर २०२३ मध्ये मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. हे आरोप त्याने मान्य केले असून आयसीसीने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. येत्या ७ एप्रिल २०२५ पर्यंत ही बंदी लागु असणार आहे.
तर झाले असे की, बांगलादेश संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या नासिर हुसेनला एका अज्ञाताकडून भेटवस्तू मिळाली होती. या भेटवस्तूच्या मोबदल्यात त्याच्याकडे खास मागणी करण्यात आली होती.
मात्र हुसेनने बांगलादेश क्रिकेट बोर्ड किंवा भ्रष्टाचारविरोधी पथकाला याबाबत कुठलीही माहिती दिली नव्हती. याबाबत जेव्हा अधिक तपास केला त्यावेळी हुसेनकडून अधिकाऱ्यांना हवे तसे सहकार्य मिळाले नाही, असेही म्हटले जात आहे. हेच कारण आहे की, आयसीसीने त्याच्यावर कठोर कारवाई केली असून,आता येणारे दोन वर्ष तो क्रिकेटपासून दुर राहणार आहे. (Latest sports updates)
अनुच्छेद २.४.३ चे उल्लंघन
हुसेनला ७५० यूएस डॉलर्स किंमत म्हणजेच भारतीय चलनानुसार ६२ हजार रुपयांचा आयफोन गिफ्ट म्हणून दिला गेला होता. याबाबत त्याने बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि भ्रष्टाचार विरोधी पथकाला माहिती देणं गरजेचं होतं. मात्र असं काहीच झालं नाही. आता एका आयफोनमुळे या क्रिकेटपटूची कारकिर्द पणाला लागली आहे.
अनुच्छेद २.४.४ चे उल्लंघन
आपल्याला अज्ञात व्यक्तीकडून भेटवस्तू मिळाली आहे याची माहिती त्याने कोणालाच दिली नव्हती. तसेच मॅच फिक्सिंग करण्याची ऑफर मिळालीये हे त्याने बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून लपवून ठेवलं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
अनुच्छेद २.४.६ चे उल्लंघन
ज्यावेळी या प्रकरणाचा तपास सुरु होता. त्यावेळी हुसेनकडून भ्रष्टाचारविरोधी पथकाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. अधिकाऱ्यांना तपासासाठी हवी असलेली महत्वाची कागदपत्रही त्याने दिली नसल्याची माहिती समोर येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.