भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावे अनेक मोठ्या रेकॉर्ड्सची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा, सर्वाधिक शतकं झळकावण्याचा आणि सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड हा सचिनच्या नावावर आहे.
या रेकॉर्ड ब्रेकिंग कारकिर्दीची सुरुवात त्याने हॅरीस शिल्ड स्पर्धेपासून केली होती. या स्पर्धेत खेळताना त्याने विनोद कांबळीसोबत मिळून ६६४ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. दरम्यान आता सचिनचा मोठा रेकॉर्ड मोडला गेला आहे.
जनरल एज्यकेशन अॅकेडमीच्या आयुष शिंदेने हॅरिस शिल्ड स्पर्धेत ४१९ धावांची विक्रमी खेळी केली आहे. ज्यावेळी सचिन आणि विनोद कांबळीने विक्रमी भागीदारी केली होती. त्यावेळी सचिनने ३२६ धावांची खेळी केली होती. तर विनोद कांबळीने ३४९ धावांची खेळी केली होती. आता आयुषने या दोघांनाही मागे सोडलं आहे.
यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज सरफराज खानने या स्पर्धेत फलंदाजी करताना ४३९ धावांची खेळी केली होती. ही या स्पर्धेतील सर्वात मोठी खेळी आहे. आता आयुषने केलेली खेळी या स्पर्धेतील दुसरी सर्वात मोठी वैयक्तिक खेळी ठरली आहे.
आयुषच्या या मॅरेथॉन खेळीच्या बळावर त्याच्या संघाने ४५ षटकात ५ गडी बाद ६४८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या संघाला या धावांच्या आसपासही पोहोचता आलं नाही. हा सामना आयुषच्या संघाने ४६४ धावांनी आपल्या नावावर केला.
पृथ्वी शॉ ने या स्पर्धेत फलंदाजी करताना ५४६ धावा चोपल्या होत्या. आयुषच्या खेळीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने या खेळीदरम्यान त्याने ४३ चौकार आणि २४ षटकार खेचले. हॅरिस शिल्ड स्पर्धेतून भारतीय संघाला अनेक ग्रेट खेळाडू मिळाले आहेत.
आता आयुष शिंदे या खेळाडूंच्या पावलांवर पाऊल ठेवून भारतीय संघात स्थान मिळणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हॅरिस शिल्ड या स्पर्धेला मुंबई क्रिकेटमध्ये मानाचं स्थान आहे. कारण या स्पर्धेत शानदार कामगिरी केलेल्या अनेक खेळाडूंनी पुढे जाऊन मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघात स्थान मिळवलं आहे. या स्पर्धेत दमदार खेळी केल्यामुळे आता आयुषही चर्चेत आला आहे. तो लवकरच अंडर १६ किंवा अंडर १९ संघात खेळताना दिसून येऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.