Kamran Ghulam Shows Bat To Pat Cummins: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मेलबर्नमध्ये सुरु आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकला आणि पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेले पाकिस्तानचे फलंदाज फुसके बार निघाले.
अवघ्या ११७ धावांवर पाकिस्तानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान पाकिस्तानचा फलंदाज कामरान गुलाम अवघ्या ५ धावा करत माघारी परतला. त्याचा बाद होण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या सामन्यात बाबर आझम बाद झाल्यानंतर, कामरान गुलाम फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यावेळी मोहम्मद रिझवान नॉन स्ट्राईकला फलंदाजी करत होता. त्यावेळी पॅट कमिन्स गोलंदाजी करत होता. त्यावेळी पॅट कमिन्स आणि कामरान यांच्यात मजेशीर फाईट पाहायला मिळाली. कमिन्सने वेगाने टाकलेला चेंडू कामरानने बॅटने अडवला. त्यानंतर कमिन्सला बॅट दाखवत हसू लागला.
कामरानने बॅट दाखवल्यानंतर कमिन्सलाही हसू आवरलं नाही. मात्र पुढच्याच चेंडूवर कमिन्सने चांगलाच काटा काढला. त्याने बाऊन्सर चेंडू टाकला, जो काही कळायच्या आत कामरानच्या कानाजवळून निघाला आणि ग्लोव्ह्सला स्पर्श करुन किपरच्या हातात गेला. कमरानने नाद केला, पण तो वाया गेला. कामरानचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
पाकिस्तानविरुद्धची वनडे मालिका झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
नुकतीच भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ३-० ने गमावली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी टी-२० मालिका ही भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर ही मालिका कुठल्याही परिस्थितीत ४-१ ने जिंकावा लागणार आहे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.