Asia Cup 2025 : संजू सॅमसनला संधी, कुणाला मिळाला डच्चू? IND vs UAE सामन्यात अशी आहे टीम इंडियाची Playing XI

IND Vs UAE Live : आशिया कप २०२५ मधील दुसरा सामना सुरु झाला आहे. या सामन्यामध्ये भारत आणि यूएई हे दोन संघ आमनेसामने आले आहे. टॉस जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND Vs UAE Asia Cup 2025
IND Vs UAE Asia Cup 2025 x
Published On

IND Vs UAE Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ मधील भारत विरुद्ध यूएई या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस झाल्यानंतर दोन्ही संघांची प्लेईंग ११ जाहीर करण्यात आली. भारताने ३ फिरकीपटूंना संधी दिली आहे.

भारताची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

युएईची प्लेईंग ११ -

मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दिकी, सिमरनजीत सिंग

सामन्यादरम्यानचे हवामान स्टेडियममधील खेळपट्टीच्या हिशोबाने प्रथम गोलंदाजी करणे फायदेशीर ठरणारे होते. त्यानुसार, सूर्यकुमार यादवने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघामध्ये कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती हे दोन आणि अक्षर पटेल हा ऑल राउंडर अशा ३ फिरकीपटूंना संघात सामील करण्यात आले आहे. संजू सॅमसनला विकेटकिपर म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे. तो पाचव्या क्रमांकावर खेळणार आहे. शिवम दुबेला देखील संधी देण्यात आली आहे.

IND Vs UAE Asia Cup 2025
Ind Vs UAE : भारत दुबईत यूएईला भिडणार, हवामान अन् खेळपट्टीचा फायदा कोणाला होणार? वाचा संपूर्ण माहिती

आशिया कप २०२५ मधील पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यामध्ये खेळला गेला. अफगाणिस्तानने ९४ धावांनी हाँगकाँगला पछाडले. या सामन्यात पारडे अफगाणिस्तानच्या बाजूने आहे. आजचा भारत विरुद्ध यूएई सामना सुद्धा एका बाजूने झुकला जाईल की बरोबरीचा सामना होईलयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IND Vs UAE Asia Cup 2025
Jerusalem Terror Attack : राजधानीत दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार! ५ जणांचा जागीत मृत्यू, थरारक VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com