Asia Cup 2022 IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारत पराभूत

आव्हानाच्या पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. मात्र, चहलने त्यांची जोडी फोडली. त्यानंतर उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी जोरदार खेळ दाखवत विजयाला गवसणी घातली.
Asia Cup 2022 IND vs SL match
Asia Cup 2022 IND vs SL match saam tv

India vs Sri Lanka Cricket Match News : आशिया कप २०२२ स्पर्धेत आज भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) दुसरा सामना श्रीलंकेविरुद्ध झाला. भारतासाठी आजचा सामना 'करो या मरो' या स्थितीचा होता. प्रथंम फलंदाजी उतरलेल्या भारतीय संघाने श्रीलंकेला १७४ धावांचं आव्हान दिलं. आव्हानाच्या पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. मात्र, चहलने त्यांची जोडी फोडली. त्यानंतर उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी जोरदार खेळ दाखवत विजयाला गवसणी घातली.

१७४ धावांचं आव्हान पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी तुफानी सुरूवात केली. भारताच्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना श्रीलंकेचे सलामीवीर पथूम निसंका आणि कुसल मेंडीस यांनी दमदार सुरूवात केली. या दोघांनी १० षटकात संघाला ८९ धावांपर्यंत पोहचवले. श्रीलंकेचे सलामीवीर जोरदार खेळाचं प्रदर्शन दाखवत असताना भारताचा गोलंदाज युजवेंद्र चहलने त्यांची जोडी फोडली.

चहलने पाथुम निसंका आणि चरित असलंकाला पाठोपाठ बाद केले. युजवेंद्र चहल आणि आर आश्विन यांनी जबरदस्त गोलंदाजी करत खेळात जान आणली. त्यानंतर आर आश्विनने दनुष्का गुणातिलकला झेलबाद केले. मात्र, भानुका राजपक्षे आणि दासुन शनाकाची जोडीने भारताच्या आव्हानाच यशस्वी पाठलाग करत टीम इंडिया पराभूत केले.

भारत विरुद्ध श्रीलंकेचा रंगतदार सामना दुबईच्या स्टेडियमवर सुरू ोता. श्रीलंकेविरोधात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाचे पहिल्या पॉवरप्लेमध्ये दोन गडी बाद झाले. केएल राहुल अवघ्या ६ धावावर बाद झाला. तर विराट कोहली शून्यावर बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा-सूर्यकुमारने संघाचा डाव सावरला.

रोहित शर्माने ३२ चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं. या अर्धशतकात ४ चौकार आणि २ षटकाराचा सामावेश आहे. आक्रमक खेळीनंतर रोहित शर्मा ७२ धावा करत तंबूत परतला. गोलंदाज चमिरा कुरूणारत्नेने रोहित शर्माला झेलबाद केले. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार देखील ३४ धावा करत तंबूत परतला.

Asia Cup 2022 IND vs SL match
Ricky Ponting | रिकी पॉन्टिंगने T20 चे टॉप-5 खेळाडू निवडले, टीम इंडियाच्या या खेळाडूंना दिले स्थान

सूर्यकुमारनंतर मैदानात उतरलेला ऋषभ पंत आक्रमक अंदाजात दिसला. त्याने १५ व्या षटकात जोरदार दोन चौकार मारले. १७ षटकानंतर भारताच्या ४ बाद १४० धावा झाल्या होत्या. त्यानंतर हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा, ऋषभ पंत स्वस्तात माघारी परतले. भूवी देखील शून्य धावावर बाद झाला. तर अश्विनने शेवटच्या दोन चेंडूवर ८ केल्या. त्यामुळे २० षटकात ८ बाद १७३ धावांपर्यंत पोहचवले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com