
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) आयसीसी रिव्ह्यू शोमध्ये त्याच्या पसंतीच्या टॉप 5 टी-20 आंतरराष्ट्रीय खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये त्याने वर्ल्ड टी-20 मध्ये हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि जसप्रीत बुमराह यांना स्थान दिले आहे. पाँटिंगने अफगाणिस्तानच्या राशिद खानची नंबर वन खेळाडू म्हणून निवड केली आहे. राशिदने टी-20 मध्ये जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला नंबर वन स्थान मिळाले आहे. T20 मधील त्याची कामगिरी आश्चर्यकारक आहे, त्यामुळे मी त्याला T20 चा नंबर वन खेळाडू मानतो, असं रिकी पाँटिंग म्हणाला.
तर पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू बाबर आझमला दुसऱ्या क्रमांकावर स्थान दिले आहे. बाबर आझमची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत जोरदार कामगिरी राहिली आहे. 'सध्या तो कोणत्या प्रकारचा फलंदाज आहे हे सांगण्यासाठी त्याचा खेळ पुरेसा आहे. गेल्या काही वर्षांपासून तो पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. माझ्या मते बाबर हा T20 मधला नंबर 2 खेळाडू आहे, असं पाँटिंग म्हणाला.
टीम इंडियाच्या हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) पाँटिंगने तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. पंड्याच्या खेळीचे पाँटिंगने कौतुक केले आहे. पंड्या T20 मध्ये खूप प्रभावी आहे. तो त्याचा खेळ चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. पूर्वीपेक्षा जास्त आत्मविश्वास त्याच्याकडे आता आहे. माझ्या मते तो T20 मध्ये जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. एकदिवसीय क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू बनण्याची त्याच्यात क्षमता आहे, असंही पांटिंग म्हणाला.
पॉन्टिंगने जॉस बटलरच्या जागी इंग्लंडच्या खेळाडूला चौथ्या क्रमांकाचे स्थान दिले आहे. तर जसप्रीत बुमराह पाचव्या क्रमांकावर आहे. 'बटलर हा सामना विजेता खेळाडू आहे. गेल्या वर्षी त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती वेगळीच होती. मला त्याला माझ्या अव्वल T20 खेळाडूंमध्ये स्थान द्यायचे होते, असंही पाँटिंग म्हणाला.
याशिवाय पाँटिंगने बुमराहबद्दल सांगितले की, 'तो सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेट, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधील सर्वात परिपूर्ण गोलंदाज आहे. नवीन चेंडू खूप चांगला आहे जेव्हा कोणीही त्याचा वापर करण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो अत्यंत धोकादायक होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.