Apollo Tyres टीम इंडियाचे नवे स्पॉन्सर, ड्रीम ११ पेक्षा जास्त पैसे देऊन केला करार

Team India Sponsors Apollo Tyres : अपोलो टायर्स हे टीम इंडियाचे अधिकृत स्पॉन्सर बनले आहेत. ड्रीम ११ ने करार मागे घेतल्यानंतर भारतीय संघ आशिया कपमध्ये स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरला होता.
Team India Sponsors Apollo Tyres
Team India Sponsors Apollo Tyresx
Published On

Indian Team : क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण असेल यावरील सस्पेंस संपला आहे. अपोलो टायर्स ही कंपनी आता भारतीय क्रिकेट संघाचा नवा स्पॉन्सर बनली आहे. केंद्र सरकारने सर्व बेटिंग अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे टीम इंडिया आणि ड्रीम ११ यांमध्ये स्पॉन्सरशिपचा करार रद्द झाला होता. ड्रीम ११ नंतर अपोलो टायर्स भारतीय संघाचे स्पॉन्सर बनले आहे.

टीम इंडियाच्या स्पॉन्सरशिपसाठी बोली लावण्यात आली होती. बोली प्रक्रियेत अपोलो टायर्सने सर्वाधिक बोली लावली. त्यांनी बीसीसीआयला प्रत्येक सामन्यासाठी ४.५ कोटी रुपये देण्याचे कबूल केले आहे. अपोलो टायर्स आणि टीम इंडिया यांच्यातील हा नवा करार २०२७ पर्यंत चालू राहणार आहे. या करारानंतर अपोलो टायर्सचा लोगो भारतीय संघाच्या जर्सीवर चमकेल.

२ सप्टेंबर रोजी बीसीसीआयने जर्सी स्पॉन्सरशिपसाठी बोली लावण्यासंदर्भात पत्रक जारी केले होते. यात गेमिंग, बेटिंग, क्रिप्टो, तंबाखू उत्पादक कंपन्या बोली लावू शकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. अन्य काही कंपन्यांना देखील बाहेर ठेवण्यात आले होते. या बोलीमध्ये अपोलो टायर्स कंपनीने जेके टायर्स आणि कॅन्व्हा अशा कंपन्यांना मागे टाकले.

Team India Sponsors Apollo Tyres
IND Vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान हँडशेक वादावर बीसीसीआयने मौन सोडलं; ICC ने पाकला तोंडावर पाडलं

अपोलो टायर्स कंपनीआधी ड्रीम११ कडे टीम इंडियाची स्पॉन्शरशिप होती. केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग कायदा मंजूर केल्याने बेटिंग अ‍ॅप्सवर बंदी घातली. यामुळे ड्रीम११ आणि टीम इंडिया यांच्यातील करार रद्द करण्यात आला. ड्रीम ११ ने जुलै २०२३ मध्ये बीसीसीआयसोबत ३५८ कोटी रुपयांचा मोठा करार केला होता. या अंतर्गत, ड्रीम ११ ने भारतीय महिला संघ, भारतीय पुरुष संघ, भारत अंडर-१९ संघ आणि भारत-अ संघाच्या किट्सचे प्रायोजक हक्क मिळवले.

Team India Sponsors Apollo Tyres
Hardik Pandya Rumoured Girlfriend : हार्दिकच्या आयुष्यात स्टायलिश अभिनेत्रीची एन्ट्री? कोण आहे पंड्याची नवी गर्लफ्रेंड?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com