

अमनजोत सिंगच्या आजीला हार्ट अटॅक आला
आजी अमनजोतला लहानपणापासून क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन द्यायची.
भन्नाट थ्रो करत अमनजोतनं भारतीय संघाला विकेट मिळवून दिली होती.
भारतीय महिला संघानं चमकदार कामगिरी करत वर्ल्ड कप जिंकलाय. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी भारतीय संघाची लढत होती. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे आव्हान दिलं होतं. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं दमदार सुरुवात केली. सामन्यातील दुसऱ्या डावाचे १० षटके झाल्यानंतरही भारतीय संघाला एकही विकेट मिळाली नव्हती.
भारतावर आफ्रिकेच्या खेळाडूंनी दबाव बनवला होता. पण हा दबाव अमनजोत कौरनं कमालीचा थ्रो करत भारतीय संघाचा दबाव दूर केला. अमनजोत कौरच्या थ्रोमुळे भारतीय संघाला पहिली विकेट मिळाली होती. इतका दबवातही अचूक थ्रो मारत अमनजोतनं भारताचं सामन्यात पुनरागमन करून दिलं. भारताला विकेट मिळवून देण्यात अमनजोत कौर यांचाही मोठा वाटा आहे.
अमनजोत कौरनं संपूर्ण सामन्यात दमदार कामगिरी केली. मैदानावर प्रतिस्पर्ध्यांच्या नाकीनऊ आणणाऱ्या अमनजोत कौरवर दु: खाचा डोंगर कोसळला होता. अंतिम सामना चालू असताना तिच्या आजीला हृदयविकाराचा झटका आला होता. भगवंती कौर ह्या अमनजोत यांच्या पाठराख्या किंवा आधारस्तंभ होत्या. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमनजोतच्या पालकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं.
मात्र भगवंती यांची नात अमनजोतला मात्र थोडी भनक देखील लागू दिली नाही. अंतिम सामन्यातून अमनजोतच लक्ष विचलित होऊ नये यासाठी त्यांनी अमनजोतला आजीला रुग्णालयाला दाखल केल्यानंतरही सांगितलं नाही. भगवंती यांनी अमनजोतला घडवलं, पण त्यांना अंतिम सामन्यातील आपल्या नातीचा पराक्रम बघता आला नाही.
भूपिंदर सिंग या आठवड्यात त्यांच्या ७५ वर्षीय आई भगवंतीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात घेऊन जात आहेत. अमनजोत कौरचे वडील सुतार आणि कंत्राटदार आहेत. त्यांचे नाव भूपिंदर आहे. त्यांच्या आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांनी अमनजोत सिंगला त्याची बातमी दिली नाही.
भूपिंदर सिंग यांनी जुन्या आठवणी सांगताना सांगितलं की, जेव्हा अमनजोतने शेजारच्या मुलांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हा तिची आजी तिला प्रोत्साहन द्याची. तिला प्रोत्साहन देण्यासाठी त्या उद्यानात खुर्चीवर बसायच्या आणि अमनजोतला क्रिकेट खेळताना कोणीही त्रास देणार नाही, याचीही त्या काळजी घेत. भगवंती या अमनजोतला पाठिंबा देत. जेव्हा मी दुकानात असायच तेव्हा आई अमनजोत शेजारील मुलांसोबत आणि इतर मुलींनीसोबत क्रिकेट खेळत तेव्हा तिची आजी तिला पाठिंबा देत.
मागील महिन्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यांना रुग्णालयात दाखल करणअयात आलं होतं. अमनजोत आधी सुरुवातीला स्केटर आणि हॉकी खेळत. मोहालीला आल्यानंतर ती क्रिकेट खेळू लागल्याचं भूपिंदर सिंग म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.