सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Ajit Pawar vs Murlidhar Mohol, Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशनची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजप अशी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रिंगणात उतरले आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावर अजित पवार मागील तीन टर्मपासून कार्यरत आहेत. आता त्यांना मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आव्हान देण्यात येत आहे. आज मुरलीधर मोहोळ अर्ज दाखल करणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या पाठोपाठ आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आज अर्ज सादर करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आणि भारतीय जनता पक्ष क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली.
अजित पवार चौथ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणार आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची २ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. राज्य सरकारकडून गेल्या तीन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी १२ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी एमओएला देण्यात आला होता.राज्य सरकारकडून मिळालेल्या या निधीचा हिशेब दिल्या नसल्याचा आरोप एमओएच्या महासचिव यांच्यावर आहे.या वेळी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिसत नाही.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेनुसार आणि नव्या स्पोर्ट्स कोडनुसार तीन टर्म अध्यक्षपद भूषवल्यानंतर चौथ्यांदा अध्यक्ष होता येत नाही. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नियमानुसार हे कृत्य बेकायदा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.