ICC: WTC च्या अंतिम सामन्यापूर्वी ICC ने 'या' संघावर केली मोठी कारवाई

Afghanistan Team Fined: या रोमांचक सामन्यापूर्वी आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या संघावर मोठी कारवाई केली
ICC
ICCSaam Tv

Srilanka vs Afghanistan : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना ७ ते ११ जून दरम्यान केनिंगटन ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. या रोमांचक सामन्यापूर्वी आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या संघावर मोठी कारवाई केली आहे.

ICC
Team India News: WTC Final तोंडावर असताना टीम इंडियासाठी वाईट बातमी; संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

या संघावर आयसीसीची मोठी कारवाई..

शुक्रवारी हंबनटोटाच्या मैदानावर श्रीलंका आणि अफगाणिस्थान या दोन्ही संघांमध्ये पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे आयसीसीने अफगाणिस्थान संघावर मॅच फिच्या २० टक्के दंड आकारला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने याबाबत माहिती दिली आहे. निर्धारित वेळेत षटक पूर्ण न झाल्यामुळे आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये असलेल्या रंजन मदुगलेने ही कारवाई केली आहे.

आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट स्टाफसाठी, निर्धारित वेळेत षटक पूर्ण न केल्यास मॅच फिचा २० टक्के दंड आकाराला जातो.

आयसीसीने शिक्षा सुनावल्यानंतर कर्णधार हशमतुल्लाहने आपली चूक मान्य केली आहे. मैदानावरील पंच , प्रजित रामबुकवेला,नितीन मेनन, तिसरे पंच मायकेल गॉफ आणि चौथे पंच लिंडन हॅनिबल यांनी स्लो ओव्हर रेटचा आरोप केला. (Latest sports updates)

ICC
WTC 2023 Final: IPL ची ट्रॉफी हुकली म्हणून काय झालं? रोहितकडे विराटला मागे सोडत इतिहास रचण्याची संधी..

श्रीलंकेचं जोरदार कमबॅक..

या सामन्यात अफगाणिस्थान संघाकडून इब्राहिम जादरानने ९८ धावांची खेळी केली. तर रहमत शाहने दुसऱ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी केली. रहमतने या डावात ५५ धावांची खेळी केली. या फलंदाजांनी केलेल्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्थान संघाने २६९ धावांचा यशस्वी प[पाठलाग केला.

तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाने जोरदार कमबॅक केलं ६ गडी बाद ३२३ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्थान संघाला केवळ १९२ धावा करता आल्या. १३२ धावांनी विजय मिळवत श्रीलंका संघाने या सामन्यात जोरदार कमबॅक केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com