Team India News: WTC Final तोंडावर असताना टीम इंडियासाठी वाईट बातमी; संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Ishan Kishan Injury: आता भारतीय संघाला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
team india
team india saam tv
Published On

Ind vs Aus WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान पार पडणार आहे. ओव्हलच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ जेतेपद मिळवण्यासाठी आमने सामने येणार आहेत.

ही महत्वाची स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू जोरदार सराव करताना दिसून येत आहेत. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

संघातील प्रमुख गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. दरम्यान आता भारतीय संघाला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

team india
Team India Playing 11: WTC च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग ११ जाहीर! दिग्गजाने धाकड फलंदाजाला ठेवलं संघाबाहेर

आक्रमक खेळाडू दुखापतग्रस्त..

भारतीय संघातील खेळाडू ओव्हलमध्ये दाखल झाले आहेत. रविवारी बीसीसीआयने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. आता ओव्हलमध्ये भारतीय खेळाडूंनी सराव करायला सुरुवात केली आहे.

दरम्यान झी न्यूज हिंदीच्या वृत्तानुसार, यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) सराव करत असताना दुखापतग्रस्त झाल्याची बातमी समोर येत आहे.

रविवारी जेव्हा भारतीय खेळाडू नेट्समध्ये सराव करत होते, त्यावेळी अनिकेत चौधरीच्या चेंडूवर तो दुखापतग्रस्त झाला आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाहीये. जर दुखापत गंभीर असेल तर नक्कीच भारतीय संघाच्या चिंतेत भर पडणार आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाचा कसून सराव..

या महत्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर खेळाडूंचे सराव करत असतानाचे फोटो शेअर केले आहेत.

अंतिम सामन्यात यष्टिरक्षक फलंदाजाच्या भूमिकेसाठी ईशान किशन आणि केएस भरत हे दोन पर्याय आहेत. दोघांपैकी कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ :

भारतीय संघरोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com