AFG vs PNG, Super 8: अफगाणिस्तानचा सुपर ८ मध्ये दणक्यात प्रवेश! बलाढ्य न्यूझीलंडची स्पर्धेतून एक्झिट

Afghanistan vs Papua New Guinea:अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीला धूळ चारत सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. तर न्यूझीलंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
AFG vs PNG, Super 8: अफगाणिस्तानचा सुपर ८ मध्ये दणक्यात प्रवेश! बलाढ्य न्यूझीलंडची स्पर्धेतून एक्झिट
afghanistan cricket teamtwitter

अफगाणिस्तान आणि पापुआ न्यू गिनी या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने ७ गडी राखून शानदार विजय मिळवला आहे. यासह स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवला आहे. अफगाणिस्तानच्या विजयाने न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. कारण न्यूझीलंडचा संघ सुपर ८ मधून बाहेर झाला आहे. या सामन्यात अफगाणिस्ताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पापुआ न्यू गिनीचा डाव अवघ्या ९५ धावांवर आटोपला. अफगाणिस्तानने हे आव्हान १५.१ षटकात पूर्ण केलं.

राशिद खानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघाने या स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. क गटात समावेश असलेल्या अफगाणिस्तानने ३ पैकी तीनही सामने जिंकले आहेत. या गटातून वेस्टइंडिजचा संघ आधीच सुपर ८ मध्ये दाखल झाला आहे. अफगाणिस्तानच्या विजयाचा सर्वात मोठा फटका न्यूझीलंडला बसला आहे. कारण न्यूझीलंडचा संघ सुपर ८ मधून बाहेर पडला आहे.

केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघात स्टार खेळाडूंची भरमार आहे. मात्र तरीदेखील या हंगामात न्यूझीलंडला एकही सामना जिंकता आलेला नाही. न्यूझीलंडसह पापुआ न्यू गिनी संघालाही एकही सामना जिंकता आलेला नाही . त्यामुळे हा संघ देखील स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

AFG vs PNG, Super 8: अफगाणिस्तानचा सुपर ८ मध्ये दणक्यात प्रवेश! बलाढ्य न्यूझीलंडची स्पर्धेतून एक्झिट
Team India News: सुपर ८ आधीच टीम इंडियाचे २ स्टार खेळाडू मायदेशी परतणार! मोठं कारण आलं समोर

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर पापुआ न्यू गिनीने अवघ्या ९५ धावा केल्या. या संघाकडून फलंदाजी करताना किपलिन डोरिगाने ३२ चेंडूत २७ धावांची खेळी केली. तर अफगाणिस्तानकडून गोलंदाजी करताना फजहलक फारुकीने १६ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर नवीन उल हकने २ गडी बाद केले. अफगाणिस्तानकडून धावांचा पाठलाग करताना गुलबदिनने ४९ धावांची खेळी केली. तर सलामीवीर गुरबाज ११ धावा करत माघारी परतला. शेवटी मोहम्मद नबीने १६ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला सामना जिंकून दिला.

AFG vs PNG, Super 8: अफगाणिस्तानचा सुपर ८ मध्ये दणक्यात प्रवेश! बलाढ्य न्यूझीलंडची स्पर्धेतून एक्झिट
IND vs PAK: रिझवानचा जीव थोडक्यात बचावला; सिराजच्या त्या बॉलवर नेमकं काय घडलं? - Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com