AFG Vs BAN Asia Cup 2023:
AFG Vs BAN Asia Cup 2023:Saam tv

AFG Vs BAN Asia Cup 2023: बांग्लादेशने अफगाणिस्तानचा उडवला धुव्वा; ८९ धावांनी मिळवला विजय

AFG Vs BAN Asia Cup 2023: अफगाणिस्तानचा संघ २४५ धावांवरच गारद झाला. बांग्लादेशने ८९ धावांनी हा सामना जिंकला

AFG Vs BAN Asia Cup 2023 :

आशिया कप स्पर्धेत आज बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तानचा सामना झाला. पाकिस्तानातील लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये हा सामना झाला. या सामन्यात बांग्लादेशने अफगाणिस्तानला ३२५ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, अफगाणिस्तानचा संघ २४५ धावांवरच गारद झाला. बांग्लादेशने ८९ धावांनी हा सामना जिंकला. (Latest Marathi News)

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाकडून मेहदी हसनने ११९ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ११२ धावांची खेळी केली.

तर शांतोने १०५ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने १०४ धावांची खेळी केली. या दोघांच्या दमदार खेळीच्या बळावर बांगलादेशने ५० षटक अखेर ५ गडी बाद ३३४ धावा केल्या होत्या. ही बांगलादेशची मायदेशाबाहेर खेळताना सर्वात मोठी सांघिक धावसंख्या आहे.

AFG Vs BAN Asia Cup 2023:
IND VS PAK: 'मैत्री मैदानाबाहेर, मैदानात फक्त..' IND-PAK खेळाडूंना गप्पा मारताना पाहून गंभीर, विराटसह संपूर्ण संघावर भडकला

अफगाणिस्तानचा संघ ठरला अपयशी..

अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी ३३५ धावांची गरज होती. मात्र अफगाणिस्तानचा संघ विजयापासून ८९ धावा दूर राहिला. अफगाणिस्तान संघाकडून जद्रानने ७६ धावांची झुंझार खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १० चौकार आणि १ गगनचुंबी षटकार मारला.

AFG Vs BAN Asia Cup 2023:
Asia Cup 2023 Matches Rescheduled: आशिया कपबाबत मोठी अपडेट; कोलंबोमधील सर्व सामने दुसऱ्या स्टेडियमवर खेळवण्यात येणार? कारण...

तर कर्णधार शाहीदीने मोलाचे योगदान देत ५१ धावांचे योगदान दिले. शेवटी राशिद खानने २४ धावांचे योगदान दिले. शेवटी ४५ व्या षटकात अफगाणिस्तानचा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com