भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेपूर्वी दोन्ही संघ वनडे आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी आमने सामने आले होते. या मालिका झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा माघारी परतला आहे. तर हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसून येतोय.
दरम्यान तिसऱ्या सामन्यात षटकार मारून सामना जिंकून दिल्यानंतर त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. तिलक वर्मा ४९ धावांवर असताना त्याने षटकार मारला होता.
या षटकारानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी देखील त्याच्यावर टीका केली होती. नुकताच माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने त्याला जोरदार खडेबोल सुनावले आहे.
सोशल मीडियावर जोरदार टीका...
तर झाले असे की, भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद ४९ धावांची खेळी केली होती. हा सामना जिंकून देण्यात तिलक वर्माने मोलाची भुमिका बजावली होती.शेवटी हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी मिळून महत्वपूर्ण भागिदारी केली होती.
ज्यावेळी भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी केवळ २ धावांची गरज होती त्यावेळी तिलक वर्मा ४९ धावांवर फंलदाजी करत होता. मुख्य बाब म्हणजे १ षटक शिल्लक होते. असे असतानाही हार्दिकने षटकार मारला. भारतीय संघाने सामना तर जिंकला मात्र तिलक वर्माचे सलग दुसरे अर्धशतक झळकावण्याची संधी हुकली.
माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्राने आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना म्हटले की,' हार्दिकला खुप ट्रोल केलं गेलं आहे. त्याच्यावर जोरदार टीका केली गेली आहे. मला अजूनही लक्षात आहे की, एकदा एमएस धोनीने फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट खेळत विराटला स्ट्राइक दिली होती. त्याला असं वाटत होतं की विराटने फिनिश करावं. त्याला लाइमलाइट नको होतं. हार्दिकला धोनी बनायची गरज नाही. जरी तो धोनीला आपला आदर्श मानत असला तरीही.' (Latest sports update)
हार्दिक पंड्या ट्रोल होत असताना एमएम धोनी ट्रेंड होत होता. धोनी आणि विराटचा एक व्हि्डिओ सोशन मीडियावर व्हायरल झाला होता. तो २०१४ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील होता. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी १ धावेची गरज होती.त्यावेळी धोनीने एक धाव घेत ६७ धावांवर नाबाद असलेल्या विराटला सामना संपवण्याची संधी दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.