Rashi : ३० वर्षानंतर शनिच्या कुंभ राशीत त्रिग्रही योग, 'या' तीन राशींची होणार भरभराट

kumbh Rashi : कुंभ राशीत शनि, सूर्य आणि बुध ग्रह यांची युती होणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर परिणाम होईल. खासकरून तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.
kumbh Rashi
kumbh Rashi Saam Tv
Published On

zodiac signs :

कुंभ राशीत ३० वर्षानंतर शनिदेव विराजमान होत आहेत. जवळपास अडीच वर्षांसाठी शनिदेव या राशीत राहतील. त्यापैकी एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. तर इतर ग्रह कमी अधिक कालावधीनंतर गोचर करत असतात. त्यामुळे कुंभ राशीत आले की शनिच्या सान्निध्यात राहावं लागत आहे. सध्या शनिला दोन ग्रहांची साथ लाभलीय. हे ग्रह म्हणजे सूर्य आणि दुसरा बुध ग्रह आहे.(Latest News)

कुंभ राशीत ३० वर्षानंतर शनि, सूर्य, बुध ग्रहाची युती होणार आहे. १३ फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर २० फेब्रुवारीला बुध ग्रह कुंभ राशीत येईल. म्हणजेच २० फेब्रुवारीपासून त्रिग्रही योग असणार आहे. बुध ग्रह ७ मार्चनंतर मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर सूर्य ग्रह १४ मार्चला मीन राशीत परिवर्तन करेल. त्यामुळे कुंभ राशीतील त्रिग्रही योग १६ दिवस असणार आहे. या दिवसात तीन राशींच्या जातकांना मोठा लाभ मिळणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मेष :

या राशीच्या एका घरात तीन ग्रहांची युती होत आहे. त्यामुळे जातकांना तीन ग्रहांचं बळ मिळणार आहे. करिअरमध्ये नवी उंची गाठण्याची संधी आहे. विदेशात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या जातकांना या काळात गोड बातमी मिळू शकते. ज्या लोकांचे व्यवसाय आहेत, त्यांना या कालावधीत प्रगतीची नवी दारं खुली होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ :

या राशीच्या दशम स्थानात त्रिग्रही योग तयार होतोय. यामुळे या राशीतील अनेकांना उत्पन्नाचं नवीन मार्ग सापडतील. हातात पैसा खेळता राहील. बहुतेकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. तसेच काही किचकट कामं पूर्ण करण्यासाठी हा कालावधी उत्तम राहील.

मिथुन :

या राशीच्या नवम स्थानात त्रिग्रह योग होत असून नशिबामुळे बरीच कामे होतील. प्रवासाचा योग आहे. काही लोक एखाद्या लांबचा प्रवास करू शकतील. जे नोकरीच्य शोधात आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी या काळात मिळेल. अनेकांना नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. मनासारखा पगार आणि पद मिळत असल्याने अनेकजण आनंदी राहतील. त्याचदरम्यान तुमच्या शत्रूंपासून तुम्हाला सावध राहावे लागेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.या सर्व गोष्टीला साम टीव्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

kumbh Rashi
Gruh Pravesh: गृह प्रवेश करायचाय? जाणून घ्या गृह प्रवेशासाठी फेब्रुवारी महिन्यातील शुभ मुहूर्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com