
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला एक वेगळं महत्त्व आहे. भौतिक सुख आणि वैवाहिक जीवनाचा कारक म्हणून या ग्रहाकडे पाहिलं जातं. ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह बलवान त्याला पुरेपूर भौतिक सुख मिळत असते. ज्योतिष कुंडली बघताना शुक्राची स्थिती पाहायली जाते आणि त्यावरून भविष्याचा आणि भौतिक सुखांचा वेध घेतला जातो.
शुक्र ग्रहाची ग्रहमंडळात शुक्र ग्रहाची स्थिती येत्या काही दिवसात बदलणार आहे. वर्षाभरानंतर शुक्र ग्रह पुन्हा एकदा स्वराशीत येणार आहे. तूळ ही शुक्राची स्वरास आहे. तूळ राशीचं स्वामी ग्रह हा शुक्र आहे. या राशीत प्रवेश करताच काही राशींना लाभ मिळणार आहे. तीन राशीच्या जातकांना याचा फायदा होणार आहे.
मकर :
या राशीच्या जातकांना साडेसाती चालू असून साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या साडेसातीमुळे त्यांचे अस्थिर झाले आहे. आता या राशीच्या लोकांना शुक्राची साथ मिळणार आहे. या तुळ राशीत कालावधीत कामात प्रगती होताना दिसेल. तसेच करिअरमध्ये काही प्रगतीचे योग जुळून येण्याचे योग आहेत. व्यवसायिकांना धनलाभ होऊ शकतो.
तूळ :
शुक्र ग्रह याच राशीत विराजमान होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना मोठा लाभ होणार आहे. या राशींच्या जातकांचा आत्मविश्वास वाढणार आहे, कारण स्वामी ग्रह आणि प्रथम स्थानात असल्याने व्यक्तिमत्व सुधारणार आहे. उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत या कालावधीत निर्माण होतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामंही देखील याकाळात पूर्ण होतील.
मेष
या राशीच्या जातकांसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण फायद्याचे ठरणार आहे. कारण सप्तम भावात शुक्र ग्रह असणार आहे. अनेकांना त्यांच्या पत्नीची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. ही भागीदारीच्या व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. लग्नासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी काही स्थळं चालून येतील. घरात लग्नासाठी जमवाजम सुरू होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.