Anjali Potdar
मन आणि इच्छा याची आज याची सांगड बसेल. जुन्या केलेल्या गोष्टींची चांगली फळे मिळतील.
नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस खास. एजंटसाठी दिवस नवीन कामे घेऊन आलेला आहे.
आज तुम्हाला केलेल्या शिक्षणामधून फायदा होईल. परदेशी जाण्याचे योग पूर्णत्वास येतील.
आज थोडे मनावर नियंत्रण ठेवा. अन्यथा अनेक अडचणी येतील. बालंट मागे लागतील.
जोडीदारांशी आज चांगले जमवून घ्याल. दोघांचे ट्युनिंग चांगले आज जमून येईल.
आपल्या जवळचे लोक वाईट गोष्टी करतील. गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल. कटकटी मागे लागतील.
प्रेमासाठी आजचा दिवस गुलाबी रंग घेऊन आलाय. प्रेमबंध सुधारतील. नवीन परिचय होतील.
कष्ट आणि मेहनत यांचा आज दिवस. पशुधनामधून फायदा मिळेल. दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील.
आपण जोडलेली नाती आज मदतीला धावून येतील. स्वतःच शिलेदार होऊ शकता.
आज थोडे कंजुसपणाने वागावे लागली. पैसे खर्च करण्यासाठी हात आखडता घेतलेला बरा.
आपल्यामधली गुण विशेषत्वाने असणारी आकर्षकता आज इतरांना भावेल. दुसऱ्यावर चांगले इम्प्रेशन पडेल.
आज दवाखान्यासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे स्वास्थ जपा. दत्तगुरुंची उपासना करा.