Shani Pradosh: शनी प्रदोष व्रतानं साडेसातीपासून होईल सुटका,जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त

Shani Pradosh: हिंदू धर्मात शनी प्रदोष व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते. शनी प्रदोष व्रताचे महिमा शास्त्रे आणि पुराणांमध्येही सांगितले आहे.
Shani Uday 2025
Shani Uday 2025saam tv
Published On

हिंदू पंचांगा अनुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा त्रयोदशी तिथीचा प्रदोष व्रत ठेवलं जातं. यावेळी व्रत २४ मे रोजी शनिवारी येत आहे. म्हणून यावेळचे व्रत हे शनि प्रदोष व्रत आहे. ही तिथी विशेष बनली आहे, कारण भगवान शिव आणि शनिदेव दोघांचीही पूजा केल्याने दोघांचेही आशीर्वाद मिळू शकतात. ज्यांच्यावर शनीचा ढैय्या किंवा साडेसतीचा प्रभाव आहे त्यांच्यासाठी या दिवशी उपवास करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.

शनी प्रदोष व्रताच्या वेळी केलेले साधे उपाय शनीच्या वाईट प्रभावापासून वाचवू शकतात. या लेखात ते उपाय काय आहेत ते जाणून घ्या. शनी प्रदोष आपल्या हिंदू धर्मात शनी प्रदोष व्रत फार महत्वाचे मानले जाते. शनि प्रदोष व्रताचे महिमा शास्त्रे आणि पुराणांमध्येही सांगितलंय. प्रदोष उपवास महिन्यातून दोनदा येतो. प्रत्येक महिन्यात दोनदा प्रदोषचं व्रत येत असतं. प्रदोष व्रताला हिंदू धर्मात खूप मान्यता आहे. या दिवशी महादेव आणि पार्वतीचं पूजा करावी.

जेव्हा हे प्रदोष व्रत शनिवारी येते, तेव्हा त्याला शनिवार प्रदोष म्हटलं जातं, त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. या दिवसाचे उपवास फलदायी आहे, परंतु शनीच्या आश्रयाने ते आणखी महत्वाचे बनते. शनि साडेसतीच्या प्रभावाने त्रस्त असलेल्यांसाठी हे व्रत खूप फायदेशीर आहे.

शनी प्रदोष व्रतची तिथी आणि मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी हे व्रत २४ मे रोजी पाळलं जाईल. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी २४ मे रोजी संध्याकाळी ७:२१ वाजता सुरू होईल. ही तिथी २५ रोजी दुपारी ३:५१ वाजता संपेल. हे व्रत २४ तारखेला सूर्योदयानुसार पाळले जाईल.

Shani Uday 2025
Amalaki Ekadashi 2025: आमलकी एकादशीच्या उपवासासाठी काय खावे? जाणून घ्या व्रताची माहिती

शनी प्रदोष व्रताची कथा

शनि प्रदोष व्रताला खूप महत्त्व आहे कारण हा दिवस शनिची साढेसाती किंवा शनिदोषाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी त्यांच्या अशुभ प्रभावांपासून वाचण्यासाठी खूप खास आहे. शनि प्रदोष व्रत केल्याने शनीच्या वाईट प्रभावांपासून मुक्तता मिळते. यासोबतच शनि प्रदोष व्रत मुलांच्या आनंदासाठी देखील फायदेशीर ठरते. जर एखाद्याच्या कुंडलीत राहू, केतू किंवा कालसर्प दोष असेल तर या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने अनेक समस्या दूर होतात.

Shani Uday 2025
Swati Nakshatra: स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींनी कोणत्या गोष्टीत करियर करावे?

शिवलिंग आणि शनिदेवाला तेलाने अभिषेक करा. तुम्हाला या दोन्ही देवांचे आशीर्वाद मिळतील. पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि दिवा लावा. शनि प्रदोष व्रत केल्याने शिव आणि शनि या दोन्ही देवतांचे आशीर्वाद एकाच वेळी मिळू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com