Amalaki Ekadashi 2025: आमलकी एकादशीच्या उपवासासाठी काय खावे? जाणून घ्या व्रताची माहिती

Amalaki Ekadashi 2025: अमलकी एकादशीचे व्रत दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येते त्या एकादशीला अमलकी एकादशी म्हटलं जातं. या दिवशी भक्त संसाराचा त्याग करून श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात.
Amalaki Ekadashi
Amalaki Ekadashi 2025:saamvtv
Published On

दर महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला एकादशी व्रत केले जाते. भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस सर्वात शुभ मानला जातो. एकादशीला श्री हरी विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी मातेची पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. व्रताचे सर्व नियम पाळल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळते. जर तुम्ही देखील हे व्रत करणार असाल तर या दिवशीच्या उपवासासाठी काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेणं आवश्यक आहे.

अमलकी एकादशी कधी आहे?

वैदिक दिनदर्शिकेनुसार अमलकी एकादशी म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ९ मार्च रोजी सकाळी ७.४५ वाजता सुरू होईल. दिनांक १० मार्च रोजी सकाळी ७.४४ वाजता समाप्त होईल. उदया तिथीनुसार अमलकी एकादशीचा मुहूर्त १० मार्च रोजी असणार आहे.

Amalaki Ekadashi
Numerology Of Mulank ४: हट्टी स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; ठरवलेली गोष्ट करतात साध्य

अमलकी एकादशीच्या दिवशी काय खावे?

आवळ्यापासून बनवलेल्या वस्तू अमलकी एकादशीच्या दिवशी खाव्यात. या दिवशी आवळ्याचे सेवन केल्याने व्यक्तीला आरोग्याशी संबंधित समस्याही दूर होऊ शकतात. या एकादशीच्या दिवशी भोपळ्याचे सेवन करावे. यामुळे सौभाग्य वाढू शकते. अमलकी एकादशीच्या दिवशी रताळ्याचे सेवन करता येते. अमलकी एकादशीच्या दिवशी नारळ किंवा खोबरं खाऊ शकतात. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद अबाधित राहतो.

Amalaki Ekadashi
Horoscope: 'या' पाच राशींचे बदलणार दिवस; नशिबाची मिळेल साथ, दूर होणार आर्थिक चणचण

अमलकी एकादशीच्या दिवशी मांस आणि मद्य सेवन करू नये. यामुळे अशुभ परिणाम होतात. अमलकी एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा आणि मसूर यांचे सेवन करू नये. अमलकी एकादशीच्या दिवशी कोबी आणि पालक खाऊ नयेत. यामुळे नुकसान होऊ शकते. मान्यतेनुसार अमलकी एकादशी व्रत केल्याने शेकडो तीर्थयात्रा आणि यज्ञांचे पुण्य मिळत असते.

या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. यामुळे जीवनातील दु:ख दूर होऊन सुख-समृद्धी येत असते. पण एकादशीचे व्रत केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते आणि करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्यास मदत होते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com