Numerology Of Mulank ४: हट्टी स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; ठरवलेली गोष्ट करतात साध्य

Numerology Of Mulank : मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. कोणत्याही महिन्याच्या ४, १३,२२ आणि ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक हा ४ आहे.
Numerology Of Mulank
Numerology Of Mulank saam tv
Published On

अंक ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा स्वभाव ओळखला जातो. व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा, व्यक्तिमत्व तसेच, आवडीनिवडी ओळखल्या जातात. आज आपण मूलांक ४ संदर्भात माहिती जाणून घेऊ. मूलांक ४ चा स्वामी ग्रह राहू आहे. कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ४ आहे. राहू ग्रहाच्या प्रभावामुळे या जन्मतारखेचे लोक हट्टी, चिडखोर आणि रागीष्ट स्वभावाचे असतात. तापट स्वभावामुळे या लोकांना कोणत्याही छोट्या-मोठ्या कारणाने राग येत असतो. पण या मूलांक असलेल्या लोकांचे स्वभाव गूण काय असतात ते जाणून घेऊ.

Numerology Of Mulank
Ketu Gochar 2025: केतू ग्रह १८ वर्षांनंतर सिंह राशीत करणार प्रवेश; ‘या’ ३ राशींना येणार 'अच्छे दिन',नोकरी अन् व्यवसायात होईल प्रगती

योजना आखण्यात तरबेज

या जन्मतारखेचे लोक प्लॅनिंग करण्यात तरबेज असतात. कोणतंही काम करण्याआधी हे लोक नीट विचार करत असतात. कोणत्याही कामाचा ते योग्य प्लॅन आखत असतात. तसेच या जन्मतारखेचे लोक वेळेचे पालन करणारे असतात. यांना प्रत्येक विषयाची माहिती असते.

Numerology Of Mulank
Zodiac Signs: सावधान, सावधान! 'या' पाच राशींपासून राहा दोन हात दूर, हुशारीसह असतात कपटी

आपल्या निर्णयावर ठाम

या जन्म तारखेला जन्मलेले लोक आपल्या निर्णयावर ठाम असतात. त्यांनी जर एकदा जर निर्णय घेतला तर ते आपल्या विचारांवर ठाम असतात. हाती घेतलेलं काम ते पूर्ण करुनच सोडतात. त्यामुळेच अनेकदा इतरांना यांच्याकडे पाहून आश्चर्यचकित वाटतं.

फिरायला आवडतं

या जन्मतारखेच्या लोकांना स्वत:वर पैसे खर्च करायला फार आवडतं. हे लोक आपल्या कपड्यांवर, इतर शॉपिंगवर खर्च करतात. या लोकांना फिरायला देखील फार आवडतं. अनेकदा इतर लोक या लोकांच्या सवयीमुळे त्रस्तदेखील होतात.

स्पष्टवक्तेपणा

या जन्मतारखेच्या लोकांना कोणतीच गोष्ट मनात ठेवायला आवडत नसतं. जे मनात आहे ते ओठांवर असतं. यामुळेच हे लोक बोलताना कधीच लाजत नाहीत. आपल्याला न आवडलेली गोष्ट हे लोक तोंडावर देखील बोलून दाखवतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com