Vaman Jayanti 2022 : वामन जयंती कधी आहे ? या दिवशी उपवास व पूजा केल्याने होतील अनेक फायदे

संपूर्ण मराठी वर्षात काही तिथी या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत.
Vaman Jayanti 2022
Vaman Jayanti 2022Saam Tv

Vaman Jayanti 2022 : संपूर्ण मराठी वर्षात काही तिथी या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत तिथी येत असतात. मात्र, त्यातील काही तिथींना ऐतिहासिक, पौराणिक घटना वा प्रसंगांमुळे वेगळे महत्त्व प्राप्त होते.

वर्षभरातील या तिथींपैकी विशेष महत्त्व प्राप्त झालेली तिथी म्हणजे भाद्रपद शुद्ध द्वादशी. विष्णूंच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार असलेल्या वामनाचा जन्म भाद्रपद द्वादशीला झाल्याचे मानले जाते. म्हणून भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन जयंती म्हणून साजरी केली जाते.

Vaman Jayanti 2022
Ganesh Chaturthi 2022 : पार्वतीच्या मळापासून बनवलेल्या गणपतीला सोंडेचे रुप कसे मिळाले ? जाणून घ्या त्यामागची कथा

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला वामन जयंती साजरी केली जाते. यंदा वामन जयंती ७ सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. वामन जयंतीच्या दिवशी भगवान विष्णूच्या वामन अवताराची पूजा केली जाते. भागवत पुराणानुसार, या दिवशी भगवान विष्णूने त्यांचा पाचवा अवतार वामन म्हणून जन्म घेतला. श्री हरीच्या वामन अवताराची उपासना पद्धत आणि मुहूर्त जाणून घेऊया.

मुहूर्त -

भाद्रपद शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी बुधवार, ७ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे ०३:०४ पासून सुरू होईल. द्वादशी तिथी गुरुवार, ८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १२:०४ वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार भगवान विष्णूच्या वामन अवताराची जयंती ०७ सप्टेंबर रोजी साजरी (Celebrate) केली जाणार आहे.

विधी -

Vaman Jayanti 2022
Ganesh Festival : गणेशोत्सवात उंदीर मामा दिसला तर, 'हे' असतील शुभ-अशुभ संकेत

- वामन जयंतीला उपवास केला जातो. या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो, असे मानले जाते. या दिवशी स्नान केल्यानंतर पदावर वामन अवताराचे चित्र स्थापित करावे. वामन अवताराचा फोटो नसेल तर श्रीहरीच्या चित्राची पूजा करावी. त्यांना रोळी, माउली, पिवळी फुले, नैवेद्य अर्पण करा. वामन अवताराची कथा वाचा किंवा ऐका.

- आता आरती करुन प्रसाद वाटा. या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान करा. या दिवशी दान करावे असे सांगितले जाते. श्रावण नक्षत्रात या दिवशी पूजा करणे उत्तम मानले जाते.

कथा -

सत्ययुगात एकदा दैत्यराज बळी ने इंद्राला हरवून स्वर्गावर आपले आधिपत्य गाजवले. इंद्राची अशी ही अवस्था बघून माता अदितींना वाईट वाटले त्यांनी आपल्या मुलाचं चांगलं होण्यासाठी विष्णूची उपासना केली. विष्णू प्रगट होऊन म्हणाले - देवी आपणांस काळजी नसावी. मी आपल्या पोटी जन्म घेऊन इंद्राला त्यांचे राज्य आणि वैभव परत मिळवून देईन.

Vaman Jayanti 2022
Ganesh Chaturthi 2022 : गणेशाला २१ दुर्वा का वाहिल्या जातात ? जाणून घ्या त्यामागची कथा

विष्णूजी देवमाता अदितीच्या पोटी वामनरूपात अवतरले. एके दिवशी जेव्हा राजा बळी अश्वमेघ यज्ञ करीत असे, तेव्हा वामनदेव बळी कडे गेले आणि त्यांनी ३ पावले जमीन देणगी स्वरूपात मागितली. बळी ने हातात पाणी घेऊन ३ पावले जमीन देण्याचा संकल्प घेतला.

संकल्प पूर्ण होतातच वामनाचा आकार वाढू लागला. त्यांनी सर्वात पहिल्या पावलात संपूर्ण धरा आणि दुसऱ्या पावलात स्वर्ग मापले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी कोणतीही जागा शिल्लक राहिली नाही तर बळी वामन देवाला म्हणाले की हे देव- संपत्तीचा स्वामी संपत्ती पेक्षाही मोठा असतो. म्हणून आपण आपले तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवावे.

सर्वकाही हरपून बसलेल्या बळीला आपल्या वचनाशी कटिबद्ध असलेले बघून वामनदेव प्रसन्न झाले. त्यांनी जसंच बळीच्या डोक्यावर आपले तिसरे पाऊल ठेवले, ते पाताळात गेले. त्यानंतर भगवान विष्णूंनी त्याला पाताळलोकाचे स्वामी केले.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com