Pradosh Vrat 2022: श्रावणातला पहिला प्रदोष व्रत कधी? पूजेचा मुहूर्त आणि महत्व

श्रावणातील पहिल्या प्रदोष व्रताचे काय आहे महत्व, पूजा कशी कराल आणि मुहूर्त कधी आहे हे जाणून घ्या
Pradosh Vrat 2022 Latest Update in Marathi
Pradosh Vrat 2022 Latest Update in Marathi SAAM TV

श्रावणातील पहिला प्रदोष व्रत (Pradosh Vrat) येणाऱ्या २५ जुलै २०२२ रोजी आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आहे. या योगमध्ये सर्व कार्ये यशस्वी होतात. जाणून घेऊयात श्रावणातील पहिल्या प्रदोष व्रताबद्दल. (Pradosh Vrat 2022)

हिंदू धर्म शास्त्रांनुसार, श्रावण महिन्यात येणारा प्रदोष व्रत खूपच शुभ मानला जातो. हिंदू पंचांगानुसार, वर्षभरात एकूण २४ प्रदोष व्रत येतात म्हणजेच प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष व्रत केले जातात. प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीवर प्रदोष व्रत ठेवला जातो. वर्षभरात येणाऱ्या प्रदोष व्रताचे आपापले वेगळे असे महत्व आहे. मात्र, श्रावणात आलेले प्रदोष व्रत विशेष महत्वाचे आहे, असे मानले जाते.

Pradosh Vrat 2022 Latest Update in Marathi
Aashadh Dip Amavasya 2022: दीप अमावस्या कधी? महत्व आणि त्या दिवशी काय करावं?

श्रावण महिना (shravan 2022) हा भगवान शंकराची पूजा-अर्चा केली जाते. या महिन्यात प्रदोष व्रत ठेवल्यास दुप्पट लाभ होतो, असे मानले जाते. श्रावण महिन्यातील पहिला प्रदोष व्रत कधी आहे? आणि या दिवशी पूजा आणि मुहूर्त कधी आहे हे जाणून घेऊयात.

श्रावणातील (Shravan) पहिला प्रदोष व्रत या वर्षी २५ जुलै रोजी आहे. या वर्षातील पहिला प्रदोष व्रत सोमवारच्या तिथीवर असेल. त्यामुळे या दिवसाचं महत्व आणखी वाढलेले आहे. श्रावणातील सोमवारी प्रदोष व्रत असल्यामुळे हा दिवस खूपच अद्भूत योग आहे. या दिवशी दान, पुण्य केल्यामुळे आणि संपूर्ण विधीवत पूजा-अर्चा केल्याने कैक पटीने लाभ होतो.

Pradosh Vrat 2022 Latest Update in Marathi
गुरुपौणिमेच्या दिवशी बनतोय खास योग, जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्ताबद्दल

श्रावण सोम प्रदोष व्रत २०२२ रोजी पूजेचा मुहूर्त २५ जुलै सोमवारी संध्याकाळी ७.१७ वाजल्यापासून रात्री ९.२१ वाजेपर्यंत आहे.

अशी कराल पूजा

श्रावणातील सोमवारी प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर अंघोळ करावी. देवघरात स्वच्छता करावी. त्यानंतर दिवे लावावेत. भगवान शंकराच्या प्रतिमेसमोर व्रत संकल्प करावे. विधीवत भगवान शंकराची पूजा-उपासना करावी. या दिवशी दूध, दही, तूप, मध आणि गंगाजलपासून पंचामृत करावे आणि भोलेनाथावर अभिषेक घालावा. पूजेवेळी बेलाचं पान, धतुरा, भांग आणि नैवेद्य द्यावे. या दिवशी स्त्रोस्त्राचे पठण करावे. कथा वाचन केल्यानंतर शिवशंकराची आरती करावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com