Aashadh Dip Amavasya 2022: दीप अमावस्या कधी? महत्व आणि त्या दिवशी काय करावं?

दीप अमावस्या कधी? या दिवसाचं काय आहे महत्व? जाणून घ्या सविस्तर माहिती
Aashadh Dip Amavasya 2022
Aashadh Dip Amavasya 2022saam Tv

आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते.

या दिवशी दिवे पेटवून सर्व देवांची मनोभावे पूजा केली जाते. शंकर भगवान, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्येच्या दिवशी पूजा केली जाते. (Aashadh Dip Amavasya 2022 Latest In Marathi)

Aashadh Dip Amavasya 2022
गुरुपौणिमेच्या दिवशी बनतोय खास योग, जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्ताबद्दल

या दिवसाचं महत्व म्हणजे या दिवशी आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं जातं आणि दिवा लावला जातो. दीप अमावस्येला (Aashadh Dip Amavasya) पवित्र नदीत स्नान करण्याचेही विशेष महत्व आहे. दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी आहे. त्यामुळं हा दिवस महत्वाचा मानला जातो.

या वर्षी अमावस्या तिथी शनिवारी २७ जुलैपासून रात्री ९.११ वाजल्यापासून सुरू होईल. २८ जुलै रोजी रात्री ११.२४ वाजेपर्यंत ती असणार आहे. गुरुपुष्यामृत योग २८ जुलै रोजी सकाळी ७.०४ वाजल्यापासून सुरू होणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१६ वाजेपर्यंत असणार आहे.

Aashadh Dip Amavasya 2022
आषाढ महिन्यातली गुप्त नवरात्री कधी आहे ? जाणून घ्या दुर्गाष्टमीचे व्रत कसे करायचे?

दीप अमावस्या - महत्व आणि काय केलं जातं?

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये पितरांचं स्मरण केलं जातं आणि पिंडदान करण्यात येतं. मात्र, आषाढ महिन्यातील (Aashadh) अमावस्येला काही ठिकाणी पितृ तर्पण देण्यात येतं. पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. दीप प्रज्ज्वलित करून पितरांचं स्मरण केलं जातं. त्यामुळं पितरांना मुक्ती मिळते, आणि ते आपल्या पुढील पिढीला आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे.

या दिवशी काय करतात?

अमावस्येला महिला वर्ग तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणा घालतात. पितरांना तर्पण आणि पुरणाचा नैवेद्य दाखवतात. पितरांना मुक्ती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी वृक्ष लागवड केल्याने ग्रह दोष शांत होतो, असे सांगितले जाते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com