Paush Amavasya: सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही करू नका, 'ही' 7 कामे, नाहीतर घरात वाढतील वाद

Somwati Amavasya: ३० डिसेंबरला पौष महिन्याची अमावस्या आहे. ही या वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, सोमवती अमावस्येच्या दिवशी ७ गोष्टी चुकूनही करू नका.
Somwati Amavasya Tips
Somwati AmavasyaGoogle
Published On

पौष महिन्यातील अमावस्या ३० डिसेंबर रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, ही एक सोमवती अमावस्या आहे, कारण ती पौष महिन्याच्या अमावस्या तिथीला सोमवारी येते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, सोमवारी येणारी अमावस्या खूप शुभ मानली जाते. हा दिवस आणि तिथी दोन्ही चंद्र आणि त्याचे शासक भगवान शिव यांना समर्पित आहे. हिंदू धर्मात अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा विशेष प्रार्थना, विधी आणि उपाय केले जातात, हे जाणून घेऊ.

सोमवती अमावस्याला दर्श अमावस्याही म्हटले जाते. या दिवशी अंघोळ-दानासह पितरांसाठी तर्पण करणं खूप शुभ असतं. यावेळी सोमवती अमावस्येला वृद्धी योग, ध्रुव योग आणि शिववास योग सयोग्य बनत आहे. यामुळे हा दिवस खूप खास बनत आहे. मान्यतेनुसार या शुभ संयोगानुसार अमावस्येला तिथीला आपली इच्छा पूर्ण होत असते. दुसरीकडे काही कामे आहेत सोमवती अमावस्येच्या दिवशी करू नये, अशीही एक धार्मिक मान्यता आहे. चला जाणून घेऊया, ही कामे कोणती आहेत?

सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकूनही या 7 गोष्टी करू नका

1. अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय होतात. त्यामुळे या दिवशी कोणत्याही निर्जन जागेतून जाऊ नये. अमावस्या दरम्यान राक्षसी आत्मा अधिक प्रभावी आणि सक्रिय राहतात. अशा स्थितीत या दिवशी केवळ धार्मिक कार्यात लक्ष घालावे.

Somwati Amavasya Tips
Safala Ekadashi : गुरुवारी साजरी होणार सफाळा एकादशी, पाहा व्रताची शुभ वेळ आणि महत्त्वाची माहिती

सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून या दिवशी पूजा केल्यानंतरच भोजन करावे. या दिवशी तुमच्या घरात आणि आजूबाजूला शांतता राखण्याचा प्रयत्न करा. या दिवशी संघर्ष किंवा संकटापासून दूर राहा. या दिवशी वैयक्तिक शुद्धता आणि ब्रह्मचर्य पाळले पाहिजे.

सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. त्यामुळे या दिवशी चुकूनही मांस आणि मद्य सेवन करू नये. शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा.

सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने सुई वापरू नये. कोणत्याही प्रकारचे शिवणकाम टाळावे. यामुळे जीवनात ग्रह दोष वाढतात आणि चंद्र सर्वात जास्त क्रोधित होतो. परिणामी, यामुळे जीवनात तणाव वाढतो.

या दिवशी घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये. या दिवशी व्यक्तीमध्ये नकारात्मक विचार वाढतो.

Somwati Amavasya Tips
Bhagavad Gita Inspiration : जीवनात सुखं हवं? गीतेचा प्रत्येक अध्याय नक्की वाचा

अशावेळी या विचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून महादेवाचं नामस्मरण करावे. जर तुम्ही सोमवती अमावस्येला उपवास करत असाल तर या दिवशी उपवास करताना मीठ वापरू नये. हा नियम केवळ सोमवती अमावस्येलाच नाही तर सर्व सणांना लागू होतो. या दिवशी कोणाशीही वाद घालू नये. या दिवशी चुकूनही इतरांना वाईट बोलू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com