Mahashivratri Jagran: महाशिवरात्रीच्या रात्री जागरण का करावं? काय आहेत धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं? वाचा योगशास्त्रातील महत्त्व

Mahashivratri Jagran: महाशिवरात्री ही भगवान शिवाला समर्पित आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार महाशिवरात्रीला रात्रभर जागरण केले जाते. यामागील धार्मिक, वैज्ञानिक आणि योगिक महत्त्व का आहे ते जाणून घ्या.
Mahashivratri Jagran:
saam tv
Published On
Summary
  • महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करण्याची परंपरा आहे.

  • धार्मिक कथांनुसार शिवपूजेला विशेष महत्त्व आहे.

  • वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानसिक जागरूकतेला चालना मिळत असते.

महाशिवरात्री हा भगवान महादेवाची आराधना करण्याचा दिवस. यंदा १५ फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. यादिवशी 'सर्वार्थसिद्धी' आणि 'अमृतसिद्धी' हे दोन शुभ योग एकत्र येत आहेत. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री येत असते. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात.

Mahashivratri Jagran:
Mahashivratri Rudrabhishek 2026: महाशिवरात्रीला रूद्राभिषेकासाठी कोणता मुहूर्त योग्य? पाहा कसा करावा अभिषेक?

भगवान महादेवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात. महाशिवरात्रीबाबत अनेक दंतकथा आहेत, काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होतं आणि जगाला विनाशापासून वाचवले होतं. हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री.

तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता. तर काही लोक या दिवसाला ‘जलरात्री’ देखील म्हणतात. दरम्यान हिंदू धर्मग्रंथांमध्ये महाशिवरात्रीची संपूर्ण रात्र जागरण करत महादेवाची पूजा करण्याचे सांगितले आहे. पण रात्री जागरणाचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे हे जाणून घेऊ. त्या आधी आपण महाशिवरात्रीला पूजा कशी केली जाते हे जाणून घेऊ.

Mahashivratri Jagran:
IRCTC Jyotirlinga Yatra: बम बम भोले! भारतीय रेल्वेची ज्योतिर्लिंग यात्रा, कसं कराल तिकीटाचं बुकिंग, जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

कशी केली जाते पूजा?

महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होत असते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप दिला जातो. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहिली जातात.

रात्री जागरणाचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

आपण धार्मिक कारण पाहिलं तर, काही कथांनुसार महाशिवरात्रीची रात्र ही महादेव आणि माता पार्वतीच्या लग्नाची रात्र मानली जाते. या दिवशी भगवान महादेवाने वैराग्य जीवनातून गृहस्थ जीवनाकडे पाऊल ठेवले होतं. जे भक्त या रात्री जागरण करून शिव आणि त्यांची शक्ती माता पार्वतीची पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जीवनातील सर्व संकटे दूर होतात. रात्रभर जागरण आणि मंत्रजपामुळे मन शुद्ध होत असते. अहंकार कमी होतो. सात्त्विक विचार, साधना आणि ध्यानामुळे साधक शिवतत्त्वाशी एकरूप होत असतो.

वैज्ञानिक कारण- ग्रहस्थिती आणि मानवी शरीर

या रात्री ग्रहाचा उत्तर गोलार्ध अशा प्रकारे असतो की मनुष्याच्या आतली ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने जाऊ लागते. म्हणजेच निसर्गच मनुष्याला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर पोहोचण्यास मदत करत असतो.

सूर्याभोवती पृथ्वीच्या हालचालीमुळे ग्रह प्रणालीनुसार उत्सव साजरा केला जातो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे गुरुत्वाकर्षण सर्वात जास्त असते. यामुळे संपूर्ण शरीरातील द्रव मेंदूच्या दिशेने वरच्या दिशेने वाढत असतात किंवा येत असतात.

जेव्हा मेंदूला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त मिळते, तेव्हा ते चांगले कार्य करत असते. ग्रहांच्या स्थितीचा मानवी रक्ताभिसरण प्रणालीवर देखील प्रभाव पडत असतो. ग्रहांच्या संरेखनामुळे, कुंडलिनी उर्जा, जी मणक्याच्या पायथ्याशी असलेल्या चक्रामध्ये असते ती ऊर्जा शिवरात्रीच्या विशेष रात्री वर जात असते. त्यामुळे रात्रभर उभ्या स्थितीत जागृत राहणे शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

योगशास्त्रातील महत्त्व

योगाभ्यासात महाशिवरात्री ही वैयक्तिक चेतना आणि वैश्विक चेतना (ब्रह्म) यांचे एकीकरण दर्शवणारी असते. ही साधकांना त्यांची आध्यात्मिक साधना अधिक खोलवर नेण्याची तसेच भक्ती जोपासण्याची, सुप्त शक्ती जागृत करण्याची संधी देत असते. आसन, प्राणायाम, ध्यान आणि आत्म-परीक्षणाद्वारे, साधक अहंकाराच्या मर्यादा ओलांडत परमात्म्यात विलीन होण्यासाठी महाशिवरात्रीची ऊर्जा वापरत असतात.

महाशिवरात्री ही भक्तीचा मार्ग आहे. भगवान शिवाचा तिसरा डोळा उच्च चेतनेच्या जागरणाचे, द्वैताच्या पलीकडे जाण्याचे आणि सर्व प्राण्यांच्या एकतेचे प्रतीक आहे. महाशिवरात्री अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर चेतनेचा विजय दर्शवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com