Mahashivratri: महाशिवरात्रीला महादेवाला काय अर्पण करावं? जाणून घ्या शुभ आणि अशुभ पदार्थांची संपूर्ण यादी

Mahashivratri: महाशिवरात्रीला दिन शिवलिंगावर काही खास वस्तू अपर्ण केल्या जातात. नियमांचे पालन केल्यानंतर महादेवाची कृपा आपल्यावर होत असते. महादेवाची कृपा झाल्यानंतर आपल्यावरील साडेसाती मिटत असते.
Mahashivratri
MahashivratriSaam Tv
Published On

महाशिवरात्रीच्या पवित्र पर्व लवकर येणार आहे. या दिवशी महादेवाची पुजा केली जाते. यादिवशी महादेवाच्या शिवलिंगार काही वस्तू अर्पण केल्या जातात. या वस्तू अर्पण केल्यानंतर महादेवाची कृपा आपल्यावर होत असते. महादेवाचा आशीर्वाद मिळाला तर आपल्यावरील साडेसाती निघून जात असते. चला तर महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवावर कोणत्या वस्तू अर्पण केल्या जातात. बऱ्याचवेळी आपण चुकीचे पदार्थ आणि वस्तूंचं अर्पण करत असतो, त्यामुळे महादेव आपल्यावर कोपत असतात.

काय अर्पण करावे

दूध : दूध हे चंद्राचे प्रतीक मानले जाते आणि शिवलिंगावर अर्पण केल्यास मानसिक शांती मिळते.

दही: दही हे शुक्राचे प्रतीक मानले जाते आणि ते शिवलिंगावर अर्पण केल्याने जीवनात समृद्धी येते.

मध : मध हे सूर्याचे प्रतीक मानले जाते आणि शिवलिंगावर अर्पण केल्याने वैभव आणि कीर्ती प्राप्त होते.

तूप : तूप हे अग्नीचे प्रतीक मानले जाते आणि शिवलिंगावर अर्पण केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते.

गंगाजल : गंगेचं पाणी हे मोक्षाचे प्रतिक मानले जाते आणि शिवलिंगावर अर्पण केल्यास पापांचा नाश होतो.

Mahashivratri
Zodiac Sign Traits: 'या'4 राशीचे लोक वयानुसार होतात अधिक सुंदर अन् आत्मविश्वासू

बेलाचे पान : बेलपत्र हे भगवान शंकराचे आवडते मानले जाते. शिवलिंगावर अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात.

धतुरा : धतुरा हे शिवाचे प्रतीक मानले जाते आणि ते शिवलिंगावर अर्पण केल्यास शत्रूंचा नाश होतो.

भांग : भांग हा भगवान शिवाचा प्रसाद मानले जाते. ते शिवलिंगावर अर्पण केल्याने भगवान शंकराची आशीर्वाद प्राप्त होत असतो.

फुले : फुले हे प्रेम आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात.शिवलिंगावर अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात.

तांदूळ: तांदूळ हे अन्नाचे प्रतीक मानले जाते. शिवलिंगावर अर्पण केल्याने धन आणि समृद्धी मिळते.

Mahashivratri
Vastu Shastra: तुळस दारासमोर ठेवताय? मग जाणून घ्या वास्तूचे 'हे' नियम, व्हाल धनवान

काय अर्पण नये

तुळशी: तुळशी भगवान विष्णूची आवडती मानली जाते. त्यामुळे शिवलिंगावर अर्पण करू नये.

केतकी फूल : केतकी फुलाला ब्रह्मदेवाने शिवाला शाप दिला होता, त्यामुळे ते शिवलिंगावर अर्पण करू नये.

लाल फूल : लाल फूल हे उग्रतेचे प्रतीक मानले जाते आणि शिवलिंगावर अर्पण करू नये.

हळद : हळद शुभ मानली जाते, मात्र ती शिवलिंगावर अर्पण करू नये.

शिवलिंगावर नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून जल अर्पण करावे.

शिवलिंगावर पाणी अर्पण करताना नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून जल अर्पण करावे.

शिवलिंगावर जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com