Hartalika 2022 : भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला 'हरतालिका' साजरी केली जाते. विवाहित, नवख्या व कुमारिका या दिवशी व्रत करतात. हा दिवस गणपती येणाच्या एक दिवसाआधी साजरा केला जातो.
यंदा ही पूजा मंगळवारी, ३० ऑगस्टला करण्यात येणार आहे. हिंदू संस्कृतीत याला विशेष महत्त्व आहे. हा व्रत पतीच्या दीर्घायुषीसाठी केला जातो. या दिवशी महिला देवी पार्वती व शंकराची पूजा करतात. महिलांनी या दिवशी उपवास ठेवून संध्याकाळी पाणी व अन्नाचे ग्रहण करणे अपेक्षित आहे परंतु, काही स्त्रिया या गणपतीची स्थापना झाल्यानंतर हे व्रत सोडतात.
हरतालिका म्हणजे जिला नेले ती, आणि आली म्हणजे सखी असा आहे. पार्वतील शिव प्राप्तीसाठी तिची सखी तपश्चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका ' असे म्हणतात.
या पूजेसाठी लागणारे साहित्य -
भगवान शंकर व पार्वतीची मूर्ती, छोटी तांब्याची किंवा स्टीलची प्लेट, चौरंग, लाल कापड, नारळ (Coconut), केळीची खांब, पाण्याचा कलश, आंब्याचे डहाळे, तूप, दिवा, अगरबत्ती किंवा धूप, दिवा लावण्यासाठी तेल, कापूर, कापूस, बेल, आघाडा, मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने (१६ झाडांची १६-१६ पानं), सुपारी, केळ्याचे काप, फळे, सुट्टी नाणी, मेहंदी, काजळ, सिंदूर, कुंकु, बागड्या, ओटीचे सामान, पंचामृत, गुळखोबरे, अक्षता, गळेसरी आदी साहित्य पूजेला लागतात.
पूजेची विधी -
या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल (Oil) लावून स्नान करावे. सुरुवातीला स्वत:ला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजेला सुरवात करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे.
घरामध्ये एका जागी चौरंग किंवा पाट ठेवावे. त्यावर रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर विडा मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.
पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने या पद्धतीने पत्री वाहतात. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छित वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. त्यानंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते खावे. दुसर्या दिवशी उत्तरपूजा करून महिला उपवास सोडतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.