Ganesh Visarjan 2022 : बाप्पाचे विसर्जन करण्याआधी 'या' ४ गोष्टी आवर्जून करा, येणाऱ्या संकटांचा होईल नाश

भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी अनंत चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते.
Ganesh Visarjan 2022
Ganesh Visarjan 2022Saam Tv

Ganesh Visarjan 2022 : माझा मोरया मोरया रे ...! बाप्पा ला आपण गणेश चतुर्थी च्या दिवशी मोठ्या उत्साहात वाजत गाजत घरी आणतो. तसेच जड अंत:करणांनी अनंत चतुर्दशी च्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते.

भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी अनंत चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. यावेळी ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. आपण बाप्पाला नदी, तलावात विसर्जित करून निरोप देतात. यावर्षी गणेश विसर्जन ९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०६.३० ते १०.४४ या वेळेत होणार आहे. सायंकाळी ५ ते ६.३० मिनिटांपर्यंतचा मुहूर्त आहे. या दहा दिवसांत बाप्पा भक्तांचे सर्व संकट (Problems) दूर करतात, असे मानले जाते.

शास्त्रात धन, उत्तम आरोग्य, सुख, बुद्धी, समृद्धी, ग्रह दोषांपासून मुक्ती मिळण्यासाठी उपाय सांगितले आहेत, जे गणेशोत्सवात केल्यास यश मिळते. गणेश विसर्जन उद्यावर आले आहे. तर हे उपाय करून पाहिल्यास गणरायाची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते.

वाणी दोष -

कुंडलीत बुध कमकुवत असेल तर वाणीशी संबंधित समस्या येतात. मुलाचे तोतरे बोलणे, कमकुवत तर्कशक्ती, ज्ञानाचा अभाव इत्यादी वाणी दोषांची लक्षणे आहेत. यापासून सुटका होण्यासाठी केळीचा हार करून गणपतीला (Ganpati) अर्पण करावा. असे केल्याने बुधाची शुभ प्राप्ती होते.

Ganesh Visarjan 2022
Ganesh Visarjan 2022 : गणेश विसर्जनाच्या दिवशी करु नका या चुका, अन्यथा...

धन लाभ -

जर आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर श्रीगणेशाला गूळ आणि गाईचे तूप बनवलेला भोग अर्पण करा. असे मानले जाते की यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. त्याच वेळी गरिबी दूर होते. गणेश विसर्जनाच्या आधी हे काम केल्याने खूप फलदायी होईल.

वाईट काम -

अनेकदा प्रयत्न करूनही गोष्टी चुकतात. अनेक वेळा ग्रह आणि वास्तू दोष याचे कारण असतात. गणपतीला विघ्नहर्ता ही पदवी दिली आहे. खूप दिवसांपासून अडकलेल्या कामात किंवा त्यात यश मिळवण्यासाठी चार नारळांची माळ करून गजाननाला अर्पण करा आणि जय गणेश, कटो क्लेश मंत्राचा जप करा.

Ganesh Visarjan 2022
Ganesh Chaturthi 2022 | गणपतीच्या काळात या तीन रंगांनी पूजा करा, घरात नांदेल सुख व समृध्दी

इच्छित जीवनसाथी -

सर्व प्रकारचे संकट आणि कामातील अडथळे दूर करणारे भगवान गणेश आहेत. लग्न लवकर व्हावे, इच्छित जीवनसाथी मिळावा किंवा वैवाहिक जीवनातील अडथळे दूर व्हावेत यासाठी हळदीमध्ये सिंदूर मिसळून गुरुवारी गणेशाच्या चरणी अर्पण करावे. त्यामुळे लवकर विवाह होण्याची शक्यता निर्माण होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com