Railway Jobs : १०वी पास आहात? पश्चिम रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; ६३००० रुपये पगार; जाणून घ्या सर्वकाही

Western Railway Job: पश्चिम रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्काउट आणि गाइड्स पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.
Railway Recruitment
Railway RecruitmentSaam Tv
Published On

रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या पश्चिम रेल्वेत भरती सुरु आहे. पश्चिम रेल्वेत स्काउट आणि गाइड कोटा (लेव्हल १ आणि लेव्हल २) पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पश्चिम रेल्वेतील या भरती मोहिमेत अर्ज करण्याची सुरुवात आजपासून झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२४ असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

Railway Recruitment
IDBI Bank Job: IDBI बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी नोकरीची संधी; मिळणार १,५७,००० रुपये पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

या नोकरीसाठी लेव्हल १ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/NAC)मध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. लेव्हल २ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी पास असणे गरजेचे आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.१८ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागते. या नोकरीसाठी उमेदवारांनी १८,००० ते ६३,२०० रुपये मासिक पगार मिळणार आहे.

Railway Recruitment
Mazagaon Dock Job: माझगाव डॉकमध्ये नोकरी करा, महिन्याला ८३००० कमवा; कोणत्या पदासाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

याचसोबत जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती सुरु आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १५०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती सुरु आहे. कॅडर ऑफिसर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे.

Railway Recruitment
High Court Job: उच्च न्यायालयात नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती सुरु; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com