Police Bharti : आतापर्यंतची सर्वात मोठी पोलीस भरती, तब्बल १०००० पदांसाठी अर्ज मागवले जाणार

Police Bharti 2025: पोलिस होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑक्टोबरमध्ये १० हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे.
Police Bharti
Police BhartiSaam Tv
Published On

पोलीस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अनेक तरुण पोलीस भरती जाहीर होण्याची वाट पाहत असतात. दरम्यान,पोलीस दलात सहभागी होणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. ऑक्टोबरमध्ये 10 हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पोलिस भरती केली जाणार आहे. यानंतर १० हजार पोलिसांची निवड केली जाईल.

Police Bharti
Government Job: खुशखबर! गृह मंत्रालयात नोकरीची संधी, पगार २१५९०० रुपये, अर्ज कसा करावा?

सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पोलिस भरतीत बँड् समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार देखील असणार आहेत. उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकाच अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्क १ हजार रुपये असणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहात त्याच जिल्ह्यातून अर्ज करता येणार आहे. (Police Bharti 2025)

Police Bharti
Mazgaon Dock Job: ८वी पास तरुणांना मिळणार सरकारी नोकरी, माझगाव डॉकमध्ये भरती, अर्ज कुठे अन् कसा करावा?

पोलिस भरती कशी होते? (Police Bharti Recruitment Process)

पोलिस भरतीसाठी उंची, छाती आणि धावणे या गोष्टी तपासल्या जातात.

१. शारीरिक चाचणी (Physical Test)

उंची, चाचणी आणि धावणे यांसारख्या गोष्टींची शारीरिक तपासणी केली जाते.

२. लेखी परीक्षा

यानंतर लेखी परीक्षा घेतली जाते. ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता या विषयांवर परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा १०० गुणांची असते.

३. मुलाखत

तुम्ही लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

४. कागदपत्रे पडताळणी

यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळमी केली जाणार आहे.

५. वैद्यकीय तपासणी

यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर उमेदवारांची पोलिस दलात नियुक्ती केली जाते.

Police Bharti
Job Opportunities: सुवर्णसंधी! दोन वर्षात ३.५ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com