NHM Vacancy: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नर्स पदासाठी भरती;मिळणार १८००० रुपये पगार;जाणून घ्या सविस्तर

NHM Latur Recruitment : राष्ट्रीय आरोग्य विभागाअंतर्गत भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात लातूर विभागासाठी ही भरती करण्यात येणार आहे. नर्स या पदासाठी नोकरीची संधी आहे.
NHM Vacancy
NHM VacancySaam Tv
Published On

महाराष्ट्रात लातूर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती सुरु आहे. जवळपास ६१ रिक्त जागांसाठी ही भरती सुरु आहे. यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवार अर्ज करु शकतात. महिला आणि पुरुष दोघांसाठीही वेगेवेगळ्या पोस्ट रिक्त आहे.

NHM Vacancy
Mumbai Airport Job: नोकरी शोधताय? मुंबई विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी; माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

लातूर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नर्स आणि एम पी डब्ल्यू पदासाठी अर्ज मागवले आहेत. महिला नर्स या पदासाठी अर्ज करु शकतात. तर एम पी डब्ल्यू पदासाठी पुरुष अर्ज करु शकणार आहेत. यासाठी नोकरीचे ठिकाण लातूर आरोग्य विभाग आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष असणे आवश्यक आहे. ५ जुलैच्या आधी ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे. राष्ट्रीय आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर येथे तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत. नर्स पदासाठी अर्ज करताना उमेदवाराचे जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग शिक्षण पूर्ण झालेले असावे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिंग नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारानेच अर्ज करावा. तर एम पी डब्ल्यू पदासाठी अर्जदाराने विज्ञान शाखेतून १२वीचे शिक्षण घेतलेले असावे.

NHM Vacancy
SBI Recruitment 2024 Eligibility: स्टेट बँकेत नोकरीची मोठी संधी! 'या' पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

नर्स पादासाठी तुम्हाला १८ हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे तर एम पी डब्ल्यू पदासाठी २० हजार रुपये मासिक पगार दिला जाणार आहे. या नोकरीसंदर्भात अधिक माहिती https://latur.gov.in/en/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

NHM Vacancy
Post Office Recruitment 2024: 10 वी पास आहात? पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल नोकरी, 35000 पदे, पात्रता, वयोमर्यादा, वाचा डिटेल्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com