Nagpur Mahapalika Bharti 2025
Nagpur Mahapalika Bharti 2025Saam Tv

Nagpur Mahapalika Bharti 2025: आनंदाची बातमी! नागपूर महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार १ लाख २२ हजार रुपये; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Nagpur Mahanagar palika Bharti 2025: नागपूर महानरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. नागपूर महानगरपालिकेत १७४ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Published on
Summary

नागपूर महानगरपालिकेत नोकरीची संधी

गट क पदांसाठी होणार भरती

१७४ पदांसाठी भरती

नागपूर महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. नागपूर महानगरपालिकेत गट क पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. नागपूर महानगरपालिकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २६ ऑगस्ट २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२५ आहे.

Nagpur Mahapalika Bharti 2025
Freshers Job Hiring : IT फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी! इन्फोसिसकडून २०,००० पदांसाठी भरती

नागपूर महानगरपालिकेत १७४ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे होणार आहे. या नोकरीसाठीची अर्जप्रक्रिया ऑनलाइन आहे.

नागपूर महानगरपालिकेत गट क पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती नागपूर महापालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुकांनी ९ सप्टेंबर २०२५ पूर्वी अर्ज करावेत.या नोकरीसाठीची ऑनलाइन परीक्षा २०० गुणांची असणार आहे. याबाबत तुम्हाला माहिती देण्यात येईल.

Nagpur Mahapalika Bharti 2025
IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे आणि कसा करावा?

भरतीमधील रिक्त जागा

नागपूरमधील या भरती मोहिमेत ज्युनिअर क्लर्क पदासाठी ६० जागा रिक्त आहेत. लीगल असिस्टंट पदासाठी ६ जागा, टॅक्स कलेक्टर पदासाठी ७४ जागा,लायब्ररी असिस्टंट पदासाठी ८ जागा रिक्त आहे. स्टेनोग्राफर पदासाठी १० जागा रिक्त आहेत. अकाउंटंट पदासाठी १० जागा रिक्त आहे. सिस्टीम अॅनालिस्ट पदासाठी १ जागा रिक्त आहे. हॉर्डवेअर इंजिनियर, डेटा मॅनेजर आणि प्रोग्रामर पदासाठी जागा रिक्त आहेत.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

या भरती मोहिमेत वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता आहे.ज्युनिअर क्लर्क पदासाठी पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे ज्ञान असाया हवे.वेगवेगळ्या पदानुसार त्या त्या विषयातील पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबतच कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

उमेदवारांना एनएमसी वेबसाइटवर नोंदणी करण्याचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे. आरक्षित प्रवर्गासाठी उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरायचे आहेत.

पगार (Salary)

ज्युनिअर क्लर्क पदासाठी उमेदवारांना १९,९००-६३,२०० रुपये पगार मिळणार आहे. लीगल असिस्टंट पदासाठी ३८,६००-१,२२,८००रुपये पगार मिळणार आहे. स्टेनोग्राफर पदासाठी ३८,६०० ते १,२२,८०० रुपये पगार मिळणार आहे.

Nagpur Mahapalika Bharti 2025
Sleep Job Offer: '9 तास झोपा अन् 10 लाख कमवा'; प्रसिद्ध कंपनीची भन्नाट ऑफर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com