Sarkari Naukri 2024: महिना दीड लाख पगार, मुंबई पोर्टमध्ये नोकरीचा बेस्ट चान्स, जाणून घ्या सविस्तर माहिती

Government Job At Mumbai Port: बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाअंतर्गत मुंबई पोर्टमध्ये भरती सुरु आहे. सिनियर अकाउंट्स ते इंजिनियरसह अनेक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
Sarkari Naukri 2024
Sarkari Naukri 2024Saam Tv
Published On

Mumbai Port Recruitment 2024: मुंबईत सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. लाखो रुपये पगाराची नोकरी मिळवण्याचे तरुणांचे स्वप्न असते. मुंबई पोर्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. मुंबई पोर्ट ऑथोरिटीमध्ये सिनियर अकाउंट्स, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह, इंजिनियरसह अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई पोर्टमध्ये नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३१ ऑगस्ट २०२४ पासून सुरु झाली आहे. तुम्ही mumbaiport.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२४ आहे.

Sarkari Naukri 2024
IDBI Recruitment: IDBI बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर होण्याची संधी, दीड लाख पगार; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या डिटेल्स

मुंबई बंदर प्राधिकरण हे बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहेत. याअंतर्गत ग्रेड I आणि ग्रेड III च्या पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. सिनियर अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट ट्राफिक मॅनेजर आणि हिंदी ट्रान्सलेटर या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन / इंजिनियर / सीए पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीबाबत अधिसूचना तुम्ही वेबसाइटवर पाहू शकतात.

मुंबई पोर्ट ऑथोरिटीमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना १९६००० ते १६०००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.

Sarkari Naukri 2024
Govt Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी मोठी बातमी, सरकारच्या कंपनीत PO च्या ४० जागा, कसा कराल अर्ज?

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. लेखी परिक्षेनंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाईल. यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.

Sarkari Naukri 2024
Bank Jobs: बँकेत ऑफिसर व्हा आणि महिन्याला एक लाख पगार घ्या; २१३ पदांसाठी मेगाभरती; जाणून घ्या पात्रता अन् अटी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com