MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी; महिन्याला पगार किती? पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

MSRTC Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. १२ वी ते पदवीधर उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
MSRTC Recruitment
MSRTC RecruitmentSaam Tv
Published On

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागात भरती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांना शिक्षणासोबतच कामाची संधी मिळणार आहे. सरकारी विभागात नोकरीचा अनुभव घेण्याची ही उत्तम संधी आहे. याअंतर्गत एसटी महामंडळात नोकरीची संधी आहे.

MSRTC Recruitment
Mazagaon Dock Job: माझगाव डॉकमध्ये नोकरी करा, महिन्याला ८३००० कमवा; कोणत्या पदासाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, यवतमाळ येथे लिपिक, सहाय्यक, शिपाई, इलेक्ट्रिशियन पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.यवतमाळ एसटी महामंडळात ६८ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १० वी पास किंवा आयटीआय किंवा डिप्लोमा पास पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या साइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांना ६००० ते १०,००० रुपये पगार मिळणार आहे.

MSRTC Recruitment
Supreme Court Job: सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी; १०वी पास तरुणांनो आजच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

सध्या मुख्यमंत्री ग्रामदूतसाठीदेखील भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर आहे. या भरतीअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत भरती केली जाणार आहे. ५०,००० रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

MSRTC Recruitment
Oil India Recruitment: परीक्षा नाही थेट नोकरी, पगार १,६०,००० रुपये; ऑईल इंडियामध्ये 'या' पदासाठी निघाली भरती!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com