
नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. भारतीय अंतराळ केंद्रात म्हणजेच इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. चांगल्या पगाराची उत्तम नोकरी मिळवण्याची ही संधी आहे. इस्त्रोअंतर्गत विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये (VSSC) ६४ पदांसाठी भरती केली जाणार आहे.
विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ६४ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. टेक्निशियन बी,ड्राफ्ट्समॅन बी, फार्मासिस्ट ए पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला २१,७०० ते ९२,३०० रुपये पगार मिळणार आहे.
इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. VSSC ISRO हे मोठे सेंटर आहेत. यामध्ये रॉकेट आणि स्पेस टेक्नोलॉजीवर काम करते.या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.
टेक्नीशियन बी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयटीआय डिग्री प्राप्त केलेली असावी. इलेक्ट्रॉनिक्स, फिटर, वेल्डर किंवा मशिनिस्ट ट्रेडमध्ये डिग्री प्राप्त केलेली असावी.
ड्राफ्ट्समॅन बी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मेकॅनिकल किंवा सिविल ड्राफ्टसमॅनमध्ये आयटीआय डिग्री प्राप्त केलेली असावी. फार्मासिस्ट ए पदासाठी उमेदवारांनी डी फार्म डिग्री प्राप्त केलेली असावी.
इस्त्रोमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर पदानुसार वेगवेगळी सॅलरी मिळणार आहे. टेक्निशियन बी आणि ड्राफ्ट्समॅन पदासाठी उमेदवारांना २१,७०० ते ६९,१०० रुपये पगार मिळणार आहे. फार्मासिस्ट ए पदासाठी २९,२०० ते ९२,३०० रुपये पगार मिळणार आहे. फार्मासिस्ट पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २९,२०० रुपये पगार मिळतो.
या नोकरीसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि स्किल टेस्टद्वारे केली जाणार आहे. तुम्हाला लेखी परीक्षेत जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातील. यानंतर टेस्ट घेतली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २ जून २०२५ पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२५ आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही ISRO च्या National Career Service (NCS) पोर्टलवर जाऊन अकाउंट बनवा. यानंतर अर्जावर क्लिक करा अन् माहिती भरा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.