
इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी
अप्रेंटिस पदांसाठी भरती
४७५ पदांसाठी होणार भरती
नोकरीच्या शोधात तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. विविध राज्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
इंडियन ऑइलमधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ सप्टेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला iocl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.
पात्रता (Eligibility)
या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १२वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत ITI/NCVT सर्टिफिकेट आणि संबंधित क्षेत्रात ३ वर्षांचा पॉलिटेक्निक इंजिनियरिंग डिप्लोमा/ आर्ट्स सायन्स कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी १८ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा?
यामध्ये जे उमेदवार ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करतील त्यांनी सुरुवातीला apprenticeshipindia.gov.in/candidate-login या वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरा.
टेक्निशियन, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन अप्रेंटिसशिप पदासाठी NATS पोर्टल nats.education.gov.in/student_register.php वर जाऊन अर्ज करु शकतात.
भरती
या भरती मोहिमेतून अप्रेंटिसशिप पदासाठी ४७५ पदे भरली जाणार आहे. ट्रेड अप्रेंटिससाठी ८० पदे तर टेक्निशियन अप्रेंटिससाठी ९५ पदे, ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी ३०० पदे रिक्त आहेत.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे
जन्म दाखला, दहावीचे सर्टिफिकेट, एसएसएलसी आणि मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र, मार्कशीट आवश्यक आहे. याचसोबत डिग्री सर्टिफिकेट, इंजिनियरिंगचे सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट असावे. पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटोदेखील अपलोड करायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.