Railway Recruitment: भारतीय रेल्वेत नोकरीची संधी; १३७६ पॅरामेडिकल पदांसाठी सुरु आहे भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Railway Paramedical Recruitment: रेल्वेमध्ये तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये तब्बल १३७६ पदांसाठी भरती सुरु आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Railway Recruitment
Railway RecruitmentSaam Tv
Published On

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रेल्वेमध्ये १३७६ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Railway Recruitment
Government Jobs : तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वेपासून ते सरकारी बँकेमध्ये सुरु आहे भरती; वाचा सर्व माहिती एका क्लिकवर

रेल्वेमध्ये पॅरामेडिकल स्टाफमध्ये ही भरती करण्यात येणार आहे. यामध्ये डायटिशियन, नर्सिंग सुपरीटेंडेट. ऑडिओलॉजिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, डेंटल हायजिनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, हेल्थ अँढ मलेरिया इन्स्पेक्टर, फार्मासिस्ट, लॅब सुपरीटेंडंट, कार्डियाक टेक्निशियन, फिल्ड वर्कर या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.

रेल्वेमध्ये पॅरामेडिकल स्टाफमध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. १७ ऑगस्ट २०२४ पासून या नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. १६ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे.

Railway Recruitment
High Court Job: ८वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. रेल्वेमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ५०० रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे.

याचसोबत आरआरबी एनटीपीसीमध्येदेखील सध्या भरती सुरु आहे. ११००० हून अधिक जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी ग्रॅज्युएट आणि अंडरग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकतात. अर्जप्रक्रिया १४ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे.

Railway Recruitment
RRB NTPC Recruitment : तरुणांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वेत तब्बल ११५८८ पदांसाठी सर्वात मोठी नोकरभरती; वयाची अट अन् पात्रता काय? जाणून घ्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com