नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी भरती सुरु आहे. (Engineers India Limited Recruitment)
इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमधील या नोकरीबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०२४ आहे. पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केलेली असावी. B.E/B.Tech/M.Tech/M.E पदवी प्राप्त असावे. तसेच रॉक इंजिनियरिंग, जियोलॉजी, हायड्रोजियोलॉजी आणि मायनिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
या नोकरीसाठी डेप्युटी मॅनेजर पदासाठी ७०,००० ते २००००० रुपये पगार मिळणार आहे. मॅनेजर पदासाठी ८०,००० ते २२०००० रुपये पगार मिळणार आहे. (Government job)
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर स्कील टेस्ट केली जाणार आहे. यानंतर शॉर्ट लिस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला मेलवर कळवले जाईल. यानंतर पुन्हा या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अर्ज कसा करावा.
या नोकरीसाठी अर्ज करताना सर्वप्रथम https://www.engineersindia.com या वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या सूचना वाचा. यानंतर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
यानंतर स्वतः चा फोटो अपलोड करावा लागेल. या अर्जाची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.