BEL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार १.४० लाख रुपये; अर्ज कसा करावा?

BEL Deputy Engineer Recruitment 2026: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डेप्युटी इंजिनियर पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
BEL Recruitment
BEL RecruitmentSaam Tv
Published On
Summary

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

डेप्युटी इंजिनियर पदासाठी भरती

पगार मिळणार १.४० लाख रुपये

नुकतंच शिक्षण पूर्ण झालंय अनेक नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रक्षा मंत्रालयाच्या नवरत्न कंपनीमधील एका कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. डेप्युटी इंजिनियर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या सरकारी नोकरीसाठी तुम्ही bel-india.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

BEL Recruitment
Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये डेप्युटी इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ३५ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२६ आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २८ वर्ष असावी.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ४०,००० ते १.४० लाख रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांनी नियुक्ती ५ वर्षांसाठी होणार आहे. हा कालावधी भविष्यात वाढवला जाऊ शकतो.

पात्रता

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेगदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई/बीटेक/ बीएससी पदवी प्राप्त केलेली असावी. सिविल इंजिनियरिंग, बॅचलर ऑफ आर्किचेक्टरमध्ये एमएससी केलेले असावे. या नोकरीसाठी फ्रेशर्स अर्ज करु शकतात.

BEL Recruitment
Government Job: १० वी शिक्षण झालेल्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर वेबसाइटवर जाऊन लॉग इन करा.

यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे.

यानंतर फोटो, कागदपत्र अपलोड करुन फॉर्म सबमिट करायचा आहे.

BEL Recruitment
Desk Job Cancer Risks: 8 तास बसून काम, ऑफिसमध्ये नोकरी करणाऱ्यांना वॉर्निंग, कॅन्सरचा अधिक धोका, काय सांगतात डॉक्टर?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com