BDL Recruitment: दहावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Bharat Dynamics Recruitment: भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत डायनामिक्स ही सरकारी कंपनी आहे. या कंपनीत अप्रेंटिस पदासाठी भरती करण्यात येत आहे.
Government Job
Government JobGoogle
Published On

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिप पदासाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १६ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

Government Job
Airport Jobs: १०वी,१२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! एअरपोर्टमध्ये नोकरी करण्याची संधी; १४०० पदांसाठी भरती

भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये एकूण ११० पदांची भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करायचे आहे. अंतिम मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाही.

अप्रेंटिसशिप पदासाठी १४ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी किंवा आयटीआयमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. विविध पदांसाठी पात्रता वेगवेगळी आहे. त्यामुळे आधी तुम्ही अधिसूचना वाचा त्यानंतर अर्ज करा.

Government Job
Government Jobs : तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, राज्यात भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती, कसा अर्ज कराल? जाणून घ्या

रजिस्ट्रेशन कसं करावं?

अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करताना सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर होमपेजवरील अप्लाय लिंकवर क्लिक करा.

यानंतर तुमची वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती भरा.

यानंतर फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट काढून ठेवा. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला दहावीचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत.

भारत सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चांगल्या सरकारी कंपनीत तुम्हाला काम करायची संधी मिळणार आहे. याचसोबत तुम्हाला प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे. ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. त्यामुळे तरुणांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

Government Job
Government Job: मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार मिळणार ८५००० रुपये; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com