AIASL Recruitment: तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; AI एअरपोर्ट सर्व्हिसमध्ये भरती; पगार किती? जाणून घ्या सविस्तर

AI Airport Service Limited Job: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेमध्ये २०८ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
AIASL Recruitment
AIASL RecruitmentSaam Tv
Published On

ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. एआयएआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, कोचिन स्टेशनसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी २०८ रिक्त जागा आहेत. या पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

कोचीन स्टेशनसाठी रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प ड्रायव्हर आणि हॅन्डी मॅन/ वुमन पदासाठी अर्ज मागवले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (aiasl job)

AIASL Recruitment
Government Job: दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, पण कुठे? वाचा सविस्तर

एआयएआय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेडमधील या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांना वॉक-इन इंटरव्ह्यूद्वारे निवडले जाणार आहे.

एआयएआय एअरपोर्ट सर्व्हिसे लिमिटेडच्या भरती मोहिमेत २०८ पदे आहेत. त्यातील रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी ३ रिक्त पदे, रॅम्प ड्रायव्हरसाठी ४ रिक्त पदे आणि हँडी मॅन आणि वुमनसाठी २०१ रिक्त पदे आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय २८ वर्ष असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.या भरतीमध्ये रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि रॅम्प ड्रायव्हर पदासाठी मुलाखत ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत घेण्यात येईल. तसेच हँडी मॅन पदासाठी ७ ऑक्टोबर रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

या मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना श्री जगन्नाथ सभागृह, वेंगूर दुर्गा देवी मंदिराजवळ, वेगूंर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन कोड-६८३५७२ येथे उपस्थित राहायचे आहे.

रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २४,९६० रुपये पगार मिळणार आहे. रॅम्प ड्रायव्हर पदासाठी २१,२७० रुपये पगार मिळणार आहे. तर हँडी मॅन आणि वुमन पदासाठी १८,८४० रुपये पगार मिळणार आहे. (AIASL Recruitment)

AIASL Recruitment
Mumbai Metro Job: खुशखबर! मुंबई मेट्रोत नोकरीची संधी; २००००० रुपये पगार; असा करा अर्ज

या नोकरीसाठी वॉक-इन इंटरव्ह्यूच्या दिवशी उमेदवारांना अर्जासह आवश्यक कागदपत्र घेऊन उपस्थित राहायचे आहे. एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या नावे डिमांड ड्राफ्ट्स सादर करणे गरजेचे आहे.

AIASL Recruitment
Kolhapur MNC Jobs : कोल्हापूरकरांना महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १०वी पास ते पदवीधर करु शकतात अर्ज; जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com