Ram Rahim : बलात्कार, हत्या प्रकरणातील गुन्हेगार, राम रहीमला सरकारकडून Z+ सुरक्षा

राम रहीम हा बलात्कार आणि हत्या प्रकरणात तुरुंगात जन्मठेपेची आणि 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. सध्या त्याला काही अटींसह 21 दिवसांची रजा देण्यात आली आहे.
Ram Rahim : बलात्कार, हत्या प्रकरणातील गुन्हेगार, राम रहीमला सरकारकडून Z+ सुरक्षा
Ram Rahim : बलात्कार, हत्या प्रकरणातील गुन्हेगार, राम रहीमला सरकारकडून Z+ सुरक्षा Saam TV

चंदीगड : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम (Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim) याच्या जीवाला खलिस्तानी समर्थकांकडून धोका असल्याच्या बातमीनंतर हरियाणा सरकारने त्याला झेड प्लस (Z Plus) श्रेणीची उच्चस्तरीय सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पंजाब निवडणुकीपूर्वी तुरुंगातून रजेवर (फर्लो) आल्यावरती घेण्यात आला असून हरयाणा सरकारकडून राम रहीमला खलिस्तान्यांपासून धोका असल्याने आपण त्याच्या सुरक्षेत वाढ केली असल्याचं सांगितलं आहे.

शिवाय सरकारने एडीजीपी (CID) यांचा अहवाल सुरक्षेचा आधार बनवला असून खलिस्तान समर्थक (Khalistan supporters) डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या जीवाला धोका पोहोचवू शकतात, त्यामुळे त्याला कडक सुरक्षा दिली असल्याचही सरकारने स्पष्ट केलं आहे.

Ram Rahim : बलात्कार, हत्या प्रकरणातील गुन्हेगार, राम रहीमला सरकारकडून Z+ सुरक्षा
Raj Kundra Pornography Case: कास्टिंग डायरेक्टरसह चौघांना अटक, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

दरम्यान, राम रहीम हा बलात्कार आणि हत्या प्रकरणात रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगात जन्मठेपेची आणि 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. सध्या त्याला काही अटींसह 21 दिवसांची रजा देण्यात आली आहे.

राम रहीमला निवडणुकीपूर्वी मिळालेल्या रजेवरती विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेआहेत.शिवाय याप्रकरणावरुन हरयाणा सरकारला विरोधकांनी लक्ष्य केलं होतं. याच प्रश्नावरती बोलताना हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (CM Manohar Lal Khattar) यांनी सांगितलं की, गुरमीत राम रहीमला फर्लो मंजूर करण्याचा आणि निवडणुकीचा काहीही संबंध नसल्याचं त्यां स्पष्ट केलं आहे.

मात्र, सिरसा मुख्यालय असलेल्या डेरा सच्चा सौदाचे उत्तर प्रदेश आणि पंजाब या निवडणूक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने अनुयायी आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com